ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदिप शिसोदे यांच्याशी विशेष चर्चा - मानसिक रुग्ण

कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाणही वाढत असल्याने कोरोना विषाणू संदर्भात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भीती इतकी वाढली की, आपल्याला कोरोना झाल्याचे कळताच काहींनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले. तर अनेक सोसायट्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्यास विरोध करण्यात आला. लॉकडऊनमुळे विद्यार्थी, नोकरदार, मजूर परगावी अडकले आहेत. या सर्वांना सध्या मानसिक स्थित्यंतरामधून जावे लागत आहे. याच संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदिप शिसोदे यांच्याशी विशेष चर्चा केली आहे.

special-discussion-with-psychiatrist-dr-sandeep-shisode

author img

By

Published : May 3, 2020, 6:10 PM IST

मुंबई- जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसचा शिरकाव भारतातही झाला आहे. देशाच्या कोनाकोपरऱ्यातून दिवसागणिक नवे रुग्ण समोर येत आहेत. कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाणही वाढत असल्याने कोरोना विषाणू संदर्भात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भीती इतकी वाढली की, आपल्याला कोरोना झाल्याचे कळताच काहींनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले. तर अनेक सोसायट्यांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्यास विरोध करण्यात आला. लॉकडऊनमुळे विद्यार्थी, नोकरदार, मजूर परगावी अडकले आहेत. या सर्वांना सध्या मानसिक स्थित्यंतरामधून जावे लागत आहे. याच संदर्भात 'ईटीव्ही भारत'ने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदिप शिसोदे यांच्याशी विशेष चर्चा केली आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदिप शिसोदे यांच्याशी विशेष चर्चा

काळजीतून लोकांमध्ये डिप्रेशनची स्थिती...

मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व सुरळीत होते. लोक कुठल्याही छोट्या-मोठ्या समस्यांवर मात करण्यासाठी आपापल्या पद्धतीने मार्ग शोधत होते. त्यात त्यांना यशही मिळत होते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर लोकांना माहिती मिळत गेली आणि त्यांच्यात एक भीती निर्माण झाली. कोरोना म्हणजे मृत्यूच असा काही लोकांचा समज झाला. आपण लाॅकडाऊनमुळे अडकलो आहेत. आता काय करायचे या काळजीतून लोकांमध्ये डिप्रेशनची स्थिती निर्माण झाली. सुरुवातीला काळजी मग चिंता आणि शेवटी डिप्रेशनध्ये अनेकजणं गेले.

कोरोना विषाणू डोळ्यांना अदृश्य मात्र, अधिक घातक...

भीतीला सामोरे जाणे, किंवा पळून जाणे असे दोन भाग असतात. मात्र, या परिस्थितीत पळून जाता येत नाही. त्या भीतीला तोंड द्याव लागत आहे. भीती अदृश्य असेल तर जास्त घातक असते. गर्दी करू नका, तोंडाला मास्क बांधा, अशाप्रकारच्या सूचना प्रशासन देत आहे. मात्र, तरिही काही लोक मला काहीही होणार नाही या अविर्भावात निष्काळजी वागत आहेत. कोरोना विषाणू डोळ्यांना अदृश्य आहे मात्र अधिक घातक आहे. दृश्य स्वरुपातील भीतीवर मात करता येते. अंधारात एखादी वस्तू पायाला लागली की समजते काहीतरी वस्तू आहे. भीती कमी होते. पण ही भीती अदृश्य असल्याने मानसिकदृष्टया त्यावर मात करण्यासाठी हातात असलेल्या गोष्टिंचा वापर करणे, स्वत:ला सूचना देणे. स्वत: खंबीर बनणे महत्वाचे आहे.

भीतीवर मात कशी करायची?

भीतीमुळे मनोशारिरिक बदल आढळतात. झोप न येणे, बीपी वाढणे, श्वासोच्छवासाला त्रास होणे, घाम येणे, झोप कमी जास्त होणे, भूक मंदावणे असी लक्षणे आढळतात. भीतीवर मात करण्यासाठी स्वत: जवळ असलेल्या साधनांचा वापर करणे. जेवढे माझ्या हातात आहे तेवढे मी करणार हा विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

समुपदेशनाची गरज का भासतेय?

कोरोना त्यांनतर लागलेले लाॅकडाऊन हे थोड्या दिवसे आहे म्हणून सगळ्यांनी सुरुवातीला एन्जोय केला. पण इतके लोक एकाचवेळी कधीच एकत्र आले नव्हते. सुरुवातीला खाण्याचे पदार्थ बनवणे, वेगवेगळे खेळ, गप्पा यातून मनोरंजन त्यांचे झाले. पण हळूहळू एकमेकांचे स्वभाव कळत गेले. मग एकमेकांमधील उणीवा कळू लागल्या. त्यामुळे घरगुती भांडण-तंटे वाढत असून सहनशीलता तुटत आहे. खरतर सहनशीलता वाढविण्याची ही चांगली संधी आहे. एकमेकांना ओळखण्यासाठी चांगली संधी आहे. उदाहरणार्थ मी जर बाबा आहे तर माझ्या मुलाला चांगला पदार्थ मला बनवून खायला घालायचा होता. तो मी आता करू शकतो. आपण छंद जोपासू शकतो.

लॉकडॉऊनमुळे अडकलेल्यांमध्ये डिप्रेशन जास्त...

लाॅकडाऊन दरम्यान डिप्रेशनमध्ये गेलेल्या असंख्य केसेस या युवकांच्या आहेत. त्यात साधारण १८ ते ३० वयोगटातील युवकांचा समावेश आहे. हा वयोगट स्वत:ला सिद्ध करण्याचा असतो. अशा काळात घरात बसून राहण्याने अनेकांना आपण नियोजीत केलेल्या गोष्टी घडत नाहीत. यातून नैराश्य येत आहे. अनेकजण समस्येला तोंड देण्यापेक्षा जास्त विचार करतात यातून नैराश्य येते. तुम्ही रंगवलेले चित्र बघाल तर नकारात्मक दिसेल. त्यामुळे सकारात्मक, वास्तववादी दृष्टिने बघालं तर मार्ग सापडेल. समस्या सोडवण्याची शक्ती स्वत: मध्येच असते.

अत्यावश्यक सेवेतील कर्मऱ्यांनी स्वत:चे मनोबल वाढवावे...

सद्या अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी खचून न जाता सर्वांनी असा विचार करायला पाहिजे की, समाजाचे नेतृत्व करण्यासाठी आपले कौशल्य वापरण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. या परिस्थीतीनून लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारी आपली आहे. लोक माझ्याकडे आदर्श म्हणून बघत आहेत. असा सकारात्मक विचार करुन आपण आपले मनोबल वाढवले पाहिजे.

नकारात्मक विचाराने सोशल सायकॉलॉजीदेखील नकारात्मक...

नकारात्मक विचारसरणीची लोक एकत्र आले की सोशल सायकॉलॉजी देखील नकारात्मक होते. या लोकांचा आत्मविश्वासदेखील कमी असतो. अवास्तव भीती असणारी मंडळी एकत्र आली की हे घडते. पण ही मंडळी विचार करत नसतात. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोसायटीत आहे हे सकारात्मक आहे. उद्या कोणालाही काही झाले तर हाच कर्मचारी तुमच्या मदतीला येइल याचा विचार करणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.