LIVE UPDATE
- 5.55 - शिवसेना उमेदवार अरविंद सावंत ९९ हजार मतांनी विजयी
- 12.30 - दक्षिण मुंबईत 10 व्या फेरीतील मतमोजणी पूर्ण, एकूण 22 फेऱ्या होणार.. शिवसेना अरविंद सावंत 153420 मते, मिलिंद देवरा 106161 मते, अनिलकुमार 8757 मते
- 12.12 - शिवसेना अरविंद सावंत - 130700 मते, काँग्रेस मिलिंद देवरा 87933 मते, वंचित बहुजन आघाडी अनिलकुमार 7044
- 11.50 - दक्षिण मुंबई मतदारसंघात 'नोटा'चा उमेदवारांना फटका, आतापर्यंत तब्बल 4100 नोटा मते..
- 11.30 - काँग्रेसचे मिलिंद देवरा चौथ्या फेरीतही पिछाडी वर .. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी घेतली 29489 मतांची आघाडी... अरविंद सावंत शिवसेना- 104033, मिलिंद देवरा ( काँग्रेस) 74544, अनिलकुमार (वंचित) 5328
- 10.40 - तिसरी फेरी... अरविंद सावंत - 60866, मिलिंद देवरा 35312, अनिल कुमार 3312, नोटा- 2335
- 10.15 - दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत 21546 मतांनी आघाडीवर
- 9.45 - 15 हजार 905 मतांनी शिवसेनेचे अरविंद सावंत आघाडीवर
- 9.15 - पहिली फेरी - अरविंद सावंत- 9578 ( शिवसेना), मिलिंद देवरा- 4244 ( काँग्रेस), अनिल कुमार 179 (वंचित)
- 9.02 - पाहिल्या फेरी अखेर.. अरविंद सावंत 5304 मतांनी आघाडी वर
- 8.30 - शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत आघाडीवर
मुंबई - दक्षिण मुंबईच्या नागरिकांनी कुणाच्या बाजून कौल दिला आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच निकाल हाती येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहाही मतदारसंघासह दक्षिण मुंबईत २९ एप्रिलला मतदान पार पडले होते. यावेळी २०१४ च्या निवडणुकीपेक्षा जवळपास एक टक्के कमी मतदान झाले.
दक्षिण-मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदाही शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. यावेळी हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी शिवसेनेला लढत द्यावी लागत आहे. मुस्लीम, जैन समाजाची मते आपल्याकडे खेचून आणण्याची स्पर्धा उमेदवारांमध्ये होती. अमराठी मतदारांना आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवाराचा विजय पक्का आहे. देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी व उदय कोटक यांनी पाठिंबा जाहीर केल्याने व्यापारी वर्गात तसेच गुजराती आणि मारवाडी समाजात वेगळा संदेश गेला आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यावेळी ५१.४६ टक्के मतदान झाले. २०१४ ला येथे ५२.४९ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या टक्केवारीत कोणताही मोठा फरक न पडल्याने दक्षिणेतील लोक कोणाला कौल देणार याची उत्सुकता लागली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील लोकसभेचा दक्षिण-मुंबई हा मतदारसंघ उच्चभ्रू, मध्यमवर्गीय ते झोपडपट्टीवासीय अशी मिश्र वस्ती असलेला मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात देशातील अग्रणी उद्योगपतीही राहतात.
दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी गेल्या लोकसभेत तब्बल सव्वा लाख मतांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. मात्र, आता या मतदारसंघातील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे शिवसेनेचा विजय यावेळी सोपा राहिला नसल्याचे बोलले जात आहे. सावंतांपुढे देवरांचे कडवे आव्हान आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल कुमार यांनी या मतदारसंघात मोठ्या पक्षांच्या तुलनेत प्रचार केला नाही. पण वंचित बहुजन आघाडीच्या मतांना सावंत आणि देवरा यांना दुर्लक्षून चालणार नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र तसेच मुंबईत सभा घेऊन मोदी विरोध कायम ठेवल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सेनेकडून मनसेला लक्ष करण्यात येत होते. जैन धर्मियांच्या भावना मनसेने दुखवल्याचा आरोप करण्यात येत आहे.
२०१४ ला काय झाले होते -
उमेदवार पक्ष मिळालेली मते
अरविंद सावंत शिवसेना ३ लाख ७४ हजार ६०९
मिलिंद देवरा काँग्रेस २ लाख ४६ हजार ०४५
बाळा नांदगावकर मनसे ८४ हजार ७७३
मीरा संन्याल आप ४० हजार २९८
नोटा - ०९ हजार ५७३
Intro:Body:
south mumbai lok sabha constituency 2019 election result live shivsena congress
south mumbai, lok sabha constituency, 2019 election, result live, shivsena, congress, bjp, अरविंद सावंत, मिलिंद देवरा
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत पुन्हा भगवा फडकवणार की, काँग्रेसचे मिलिंद देवरा गुलाल उधळणार
मुंबई - दक्षिण मुंबईच्या नागरिकांनी कुणाच्या बाजून कौल दिला आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच निकाल हाती येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहाही मतदारसंघासह दक्षिण मुंबईत २९ एप्रिलला मतदान पार पडले होते. यावेळी २०१४ च्या निवडणुकीपेक्षा जवळपास एक टक्के कमी मतदान झाले.
दक्षिण-मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदाही शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात लढत होत आहे. यावेळी हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी शिवसेनेला लढत द्यावी लागत आहे. मुस्लीम, जैन समाजाची मते आपल्याकडे खेचून आणण्याची स्पर्धा उमेदवारांमध्ये होती. अमराठी मतदारांना आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होणाऱ्या उमेदवाराचा विजय पक्का आहे. देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी व उदय कोटक यांनी पाठिंबा जाहीर केल्याने व्यापारी वर्गात तसेच गुजराती आणि मारवाडी समाजात वेगळा संदेश गेला आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यावेळी ५१.४६ टक्के मतदान झाले. २०१४ ला येथे ५२.४९ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या टक्केवारीत कोणताही मोठा फरक न पडल्याने दक्षिणेतील लोक कोणाला कौल देणार याची उत्सुकता लागली आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील लोकसभेचा दक्षिण-मुंबई हा मतदारसंघ उच्चभ्रू, मध्यमवर्गीय ते झोपडपट्टीवासीय अशी मिश्र वस्ती असलेला मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात देशातील अग्रणी उद्योगपतीही राहतात.
दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी गेल्या लोकसभेत तब्बल सव्वा लाख मतांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. मात्र, आता या मतदारसंघातील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे शिवसेनेचा विजय यावेळी सोपा राहिला नसल्याचे बोलले जात आहे. सावंतांपुढे देवरांचे कडवे आव्हान आहे.
अमराठी भाषकांची निर्णायक भूमिका -
दक्षिण मुंबई मतदारसंघ हा कुलाबा, कफ परेड, वरळी ते शिवडी विधानसभा मतदारसंघात विभागाला आहे. हा मतदारसंघ बहुभाषिक आहे. दक्षिण मुंबईतून मराठी टक्का कमी झाला असून जैन, गुजराती, मारवाडी आणि मुस्लीम मतदार या मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावू शकतात. या मतदारसंघात जैन धर्मियांचे पर्युषण काळातील आंदोलन हा चर्चेचा विषय झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र तसेच मुंबईत सभा घेऊन मोदी विरोध कायम ठेवल्याने शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सेनेकडून मनसेला लक्ष करण्यात येत होते. जैन धर्मियांच्या भावना मनसेने दुखवल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या मतदारसंघातील चिराबाजार, गिरगाव, ग्रॅन्टरोड, ताडदेव, कुंभारवाडा, खेतवाडी, शिवडी, वरळी ही शिवसेनेची बलस्थाने आहेत. मात्र, असे असले तरी काँग्रेसनेही दोनदा हा मतदारसंघ जिंकला आहे. नागपाडा, भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड येथील मुस्लीम बहुल भागावर देवरा यांनी लक्ष केंद्रित केले होते.
मागील निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव या मतदारसंघात होता. पण आता तशी परिस्थिती नाही. नोटाबंदी, वस्तू आणि सेवा करामुळे व्यापारी वर्गात नाराजी आहे. तर बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या मुद्यावर सावंत यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे. तसेच कोस्टल रोडच्या मुद्यावर वरळीतील कोळी समाजाच्या तीव्र रोषाला सावंत यांना सामोरे जावे लागले.
मतदारसंघातील पक्षीय बलाबल
कुलाब्यापासून शिवडीपर्यंत एकूण ३६ नगरसेवक असून त्यात शिवसेनेचे १८, भाजपचे १०, काँग्रेसचे ६, अखिल भारतीय सेना आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी एक असे बलाबल आहे. शिवसेना आणि भाजपचे मिळून २८ नगरसेवक या मतदारसंघात आहेत.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल कुमार यांनी या मतदारसंघात मोठ्या पक्षांच्या तुलनेत प्रचार केला नाही. पण वंचित बहुजन आघाडीच्या मतांना सावंत आणि देवरा यांना दुर्लक्षून चालणार नाही.
अरविंद सावंत यांची बलस्थानं..
शिवसेनेचे संघटनात्मक जाळे, युतीमुळे लाभ, पाकिस्तानात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे तयार झालेली मोदींची प्रतिमा, मतदारसंघात चांगला जनसंपर्क, संसदेत प्रभावी कामगिरी
अरविंद सावंत यांची पडती बाजू..
नोटबंदी, वस्तू आणि सेवा कायद्यानुसार बदलणाऱ्या कर रचनेमुळे व्यापारी वर्गातील नाराजी, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न
मिलिंद देवरा यांची बलस्थानं
व्यापारी आणि उद्योग जगतातील भाजप सरकारच्या विरोधातील नाराजी, वडील दिवंगत मुरली देवरा यांच्यापासूनच्या कार्यकर्त्यांचे जाळे, मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अमराठी मतदार
मिलिंद देवरा यांचे कच्चे दुवे
गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील कमी संपर्क, काँग्रेसमधील गटबाजी, नेत्यांमध्ये मतभेद
२०१४ ला काय झाले होते -
उमेदवार पक्ष मिळालेली मते
अरविंद सावंत शिवसेना ३ लाख ७४ हजार ६०९
मिलिंद देवरा काँग्रेस २ लाख ४६ हजार ०४५
बाळा नांदगावकर मनसे ८४ हजार ७७३
मीरा संन्याल आप ४० हजार २९८
नोटा - ०९ हजार ५७३
Conclusion: