ETV Bharat / state

दक्षिण-मध्य मुंबई विधानसभा निकाल विश्लेषण - महाराष्ट्र इलेक्शन रिजल्ट

मध्यमवर्गीय ते नव्याने उभ्या राहिलेल्या टाऊनशिप आणि गरीब कुटुंबे, असा संमिश्र दक्षिण-मध्य मुंबईचा भाग आहे. यातील सहा मतदारसंघांत भाजप व शिवसेनेने प्रत्येकी दोन जागा पटकावल्या.

दक्षिण-मध्य मुंबई विधानसभा
author img

By

Published : Oct 25, 2019, 10:53 AM IST

मुंबई - दक्षिण-मध्य मुंबई विधानसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघांत लोकसभा निकालाअनुरुप सरळसोट निकाल लागले. विजयी उमेदवार सुरुवातीपासूनच आघाडीवर कायम राहिले. अणुशक्ती नगरात राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी मागील पराभवाचा वचपा काढला. उर्वरित आमदारांनी आपापल्या जागा जपल्या. विशेष म्हणजे, सर्वच उमेदवारांच्या आघाडीत वाढ झाली आहे.

हेही वाचा- यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बंडखोरी सपशेल फेल

मध्यमवर्गीय ते नव्याने उभ्या राहिलेल्या टाऊनशिप आणि गरीब कुटुंबे, असा संमिश्र दक्षिण-मध्य मुंबईचा भाग आहे. यातील सहा मतदारसंघांत भाजप व शिवसेनेने प्रत्येकी दोन जागा पटकावल्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा जिंकली. मतमोजणीत जे उमेदवार जिंकले, त्यांची सुरुवातीपासूनच आघाडी होती. त्यामुळे मतमोजणीत फार चुरस दिसली नाही. केवळ माहिम मतदारसंघात मनसेच्या संदीप देशपांडे यांनी सुरुवातीच्या तीन फेऱ्यांत चांगली मते घेतल्याने येथील लढत चुरशीची ठरेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात पुढे शिवसेनेचे सदा सरवणकर हे आघाडी घेत गेल्याने त्यांचा थेट विजय झाला. अणुशक्ती नगरचे एकवेळ आमदार राहिलेले नवाब मलिक हे मागील निवडणुकीतील पराभवानंतर यंदा पुन्हा रिंगणात होते. तेथेही काहीशी चुरस होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात नवाब मलिक यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत विजय मिळवत ही जागा शिवसेनेच्या तुकाराम काते यांच्याकडून खेचली.

याखेरीज सायन-कोळीवाडा आणि वडाळ्यात अपेक्षेनुसार भाजपच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवला. धारावीत काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनीही थेट विजय मिळवत पारंपरिक मतदारसंघावरील वर्चस्व कायम राखले. तर चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर यांनीही दुसऱ्यांदा विजय मिळवत काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकात हंडोरे यांचा पराभव केला व जागा राखली.

या सहाही मतदारसंघांतील विजयी उमेदवारांच्या आघाडीत वाढ झाल्याचे दिसले. धारावीत वर्षा गायकवाड यांची आघाडी ११ हजार ८२४ वरुन १५ हजार ३२८, सायन-कोळीवाड्यात कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांची आघाडी ३ हजार ७८७ वरुन १३हजार ९२१, वडाळ्यात कालिदास कोळमकर यांची आघाडी ८०० वरुन ३० हजार ८४५, माहिमध्ये सदा सरवणकर यांची आघाडी ५ हजार ९४१ वरुन १८हजार ६४७ तर चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर यांची आघाडी १०हजरा २७ वरुन १९हजार१८ झाली. अणुशक्ती नगरात नवाब मलिक यांचा गेल्या वेळी १हजार७ मतांनी पराभव झाला होता. ते यंदा १२हजार ७५१ मतांनी विजयी झाले.

मतदारसंघ विजयी उमेदवार पक्ष मते

  • अणुशक्ती नगर चेंबूर राष्ट्रवादी काँग्रेस ६५ हजार २१७
  • चेंबूर प्रकाश फातर्पेकर शिवसेना ५३ हजार २६४
  • धारावी वर्षा गायकवाड काँग्रेस ५३ हजार ९५४
  • सायन कोळीवाडा कॅप्टन आर. तमिळ सेल्वन भाजप ५४ हजार ८४५
  • वडाळा कालिदास कोळमकर भाजप ५६ हजार ४८५
  • माहिम सदा सरवणकर शिवसेना ६१ हजार ३३७

Intro:Body:mh_mum_south_central_mumbai_7204684

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा विश्लेषण

अणुशक्ती नगरमधे राष्ट्रवादीची बाजी

- आमदारांनी राखल्या स्वत:च्या जागा

मुंबई:दक्षिण-मध्य मुंबई लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघांत लोकसभा निकालाअनुरुप सरळसोट निकाल लागले. विजयी उमेदवार सुरुवातीपासूनच आघाडीवर कायम राहिले. अणुशक्ती नगरात राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी मागील पराभवाचा वचपा काढला. उर्वरित आमदारांनी आपापल्या जागा जपल्या. विशेष म्हणजे, सर्वच उमेदवारांच्या आघाडीत वाढ झाली आहे.

मध्यमवर्गीय ते नव्याने उभ्या राहिलेल्या टाऊनशिप आणि गरीब कुटुंबे, असा संमिश्र दक्षिण-मध्य मुंबईचा भाग आहे. यातील सहा मतदारसंघांत भाजप व शिवसेनेने प्रत्येकी दोन जागा पटकावल्या; तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा जिंकली. मतमोजणीत जे उमेदवार जिंकले त्यांची सुरुवातीपासूनच आघाडी होती. त्यामुळे मतमोजणीत फार चुरस दिसली नाही. केवळ माहिम मतदारसंघात मनसेच्या संदीप देशपांडे यांनी सुरुवातीच्या तीन फेऱ्यांत चांगली मते घेतल्याने येथील लढत चुरशीची ठरेल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात पुढे शिवसेनेचे सदा सरवणकर हे आघाडी घेत गेल्याने त्यांचा थेट विजय झाला. अणुशक्ती नगरचे एकवेळ आमदार राहिलेले नवाब मलिक हे मागील निवडणुकीतील पराभवानंतर यंदा पुन्हा रिंगणात होते. तेथेही काहीशी चुरस होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात नवाब मलिक यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत विजय मिळवत ही जागा शिवसेनेच्या तुकाराम काते यांच्याकडून खेचली.

याखेरीज सायन-कोळीवाडा आणि वडाळ्यात अपेक्षेनुसार भाजपच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवला. धारावीत काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनीही थेट विजय मिळवत पारंपरिक मतदारसंघावरील वर्चस्व कायम राखले. तर चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर यांनीही दुसऱ्यांदा विजय मिळवत काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकात हंडोरे यांचा पराभव केला व जागा राखली.

या सहाही मतदारसंघांतील विजयी उमेदवारांच्या आघाडीत वाढ झाल्याचे दिसले. धारावीत वर्षा गायकवाड यांची आघाडी ११,८२४ वरून १५,३२८, सायन-कोळीवाड्यात कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांची आघाडी ३७८७ वरून १३,९२१, वडाळ्यात कालिदास कोळमकर यांची आघाडी ८०० वरून ३०,८४५, माहिमध्ये सदा सरवणकर यांची आघाडी ५,९४१ वरून १८,६४७ तर चेंबूरमध्ये प्रकाश फातर्पेकर यांची आघाडी १०,०२७ वरून १९,०१८ झाली. अणुशक्ती नगरात नवाब मलिक यांचा गेल्या वेळी १००७ मतांनी पराभव झाला होता. ते यंदा १२,७५१ मतांनी विजयी झाले.

--------

मतदारसंघ विजयी उमेदवार पक्ष मते

अणुशक्ती नगर चेंबूर राष्ट्रवादी काँग्रेस ६५,२१७

चेंबूर प्रकाश फातर्पेकर शिवसेना ५३,२६४

धारावी वर्षा गायकवाड काँग्रेस ५३,९५४

सायन कोळीवाडा कॅप्टन आर. तमिळ सेल्वन भाजप ५४,८४५

वडाळा कालिदास कोळमकर भाजप ५६,४८५

माहिम सदा सरवणकर शिवसेना ६१,३३७

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.