ETV Bharat / state

Sudhir Mungantiwar : 'माझ्याही गाडीचे कुणीतरी नटबोल्ट काढले होते, घातपाताचा प्रयत्न पण...'

संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी येत असल्याचे म्हटले होते. याला आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. माझ्या गाडीचे सर्व नटबोल्ट कोणीतरी काढले होते. माझा अपघात घडवण्याचा काहींचा कट होता. त्यावेळी मी मीडियाकडे नाही गेलो, असा खुलासा त्यांनी केला.

Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांना सुनावले
author img

By

Published : Aug 3, 2023, 9:14 PM IST

मुंबई : मुनगंटीवार पुढे म्हणाले की, माझ्या गाडीचे सर्व नटबोल्ट काढले होते. गाडीत काही बिघाड आहे का? याची माहिती घेण्यासाठी मी कंपनीत विचारले तर ते म्हणाले की, असे कधीच होऊ शकत नाही. आमच्या भाजपच्या अनेक नेत्यांना नेहमी धमकी येते. आता ATS ने पण सांगितले आहे की, सावध राहा. आम्हांला सूचनाही केल्या. कोणतीही लिंक आली की, ती ओपन करायची नाही. आम्हाला घातपात होईल की अन्य काही होईल याची भीती नाही. पण, ATS ने सर्वांना सांगितले आहे, अगदी विरोधकांना पण सांगितले आहे.

आम्हालाही धमकी मिळते, पण...: आमदार यशोमती ठाकूर यांनी सभागृहात सांगितले की, मी मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केल्यामुळे त्यांचे समर्थक सध्या मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आम्हाला पण धमकी मिळते. पण, आम्ही या गोष्टी मीडियाला सांगत नाहीत. आम्ही थेट पोलिसांकडे जातो. कारण, तो विषय पोलिसांचा आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना धमकी दिली जाते. पण, आम्ही आतापर्यंत कधी थेट मीडियाकडे गेलो नाही. माझ्यापण गाडीचे नटबोल्ड काढले होते. माझा अपघात घडवण्याचा काहींचा कट होता. त्यावेळीसुद्धा मी मीडियाकडे नाही गेलो.

नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची चौकशी होईल : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता की नाही, याची आम्ही सर्व बाजूंनी चौकशी करू. स्टुडिओचा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी काही करता येईल का ते आम्ही पाहू. तूर्त यावर कोणतीही घोषणा करू नका, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. यावर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची पुढची चौकशी नितीन देसाई यांच्या कुटुंबीयांशी बोलून करू, असे सांगितले आहे.

नितीन देसाईंच्या कुटुंबाशी चर्चा करणार : मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, नितीन देसाईंच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या काही क्लिप आहेत. त्यांच्या कुटुंबाशी चर्चा केली पाहिजे. कायद्याने पुढे जायला पाहिजे. एक समिती नियुक्त करून जे निकष येतील त्यावर योग्य निर्णय घेऊ. त्यांच्या कुटुंबाची इच्छा जाणून घ्यावी लागेल. त्यांच्या परवानगीशिवाय एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. परिवारातील सर्वांशी चर्चा करू आणि कायद्याने पुढे जाऊ.

हेही वाचा:

  1. Bombay HC : विधान परिषदेतील बारा आमदारांचे नियुक्ती प्रकरण; उच्च न्यायालयात याचिका
  2. Ravikant Tupkar News: शिवसेनेसह राष्ट्रवादीनंतर स्वाभिमानी संघटनेत फूट पडणार? रविकांत तुपकर यांनी केला मोठा दावा
  3. AMIT SHAH IN LOK SABHA : दिल्ली हे पूर्ण राज्य नाही, संसदेला कोणत्याही विषयावर कायदे करण्याचा पूर्ण अधिकार - शहा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.