ETV Bharat / state

Solapur drugs factory case : मुंबई गुन्हे शाखेची कारवाई; सोलापूर ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी हैदराबादमधून एकाला अटक - कैलासन वनमाली

Solapur drug factory case : मुंबई गुन्हे शाखेकडून अमली पदार्थ प्रकरणात हैदराबाद येथून एका केमिकल इंजिनियरला अटक करण्यात आली आहे. तसंच आरोपीला कॉल डिटेल रेकॉर्डच्या (सीडीआर) मदतीनं शोधण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेनं दिलीये.

Solapur drug factory case
सोलापूर ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी हैद्राबादमधून एकाला अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 12:52 PM IST

मुंबई Solapur drug factory case : सोलापूर ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी हैद्राबाद येथून एका केमिकल इंजिनियरला अटक करण्यात आली आहे. तसंच आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेकडून देण्यात आलीये.

केमिकल इंजिनियरला अटक : कैलासन वनमाली असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. कैलासन वनमाली हा एमडी आणि इतर अमली पदार्थांचा फार्म्युला देण्याचं काम करत होता. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी आरोपींचा समावेश असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेनं दिलीये.

मुंबई गुन्हे शाखेनं काय म्हंटलंय : दोन आठवड्यांपूर्वी सोलापुरातील एका कारखान्यावर छापा टाकून 16 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज आणि 100 कोटी रुपयांच्या ड्रग्जचा कच्चा माल जप्त करण्यात आला होता. तसंच या प्रकरणी दोन आरोपींना अटकही करण्यात आली होती. फरार असलेल्या मुख्य आरोपीला कॉल डिटेल रेकॉर्डच्या (सीडीआर) मदतीने हैदराबाद येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असं मुंबई गुन्हे शाखेकडून सांगण्यात आलंय.

यापूर्वी दोघांना अटक : काही दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकानं खार परिसरातून 16 कोटीच्या एमडी ड्रग्जसह अतुल किशन गवळी (वय ३२) आणि राहुल किशन गवळी (वय २७) या दोन्ही भावांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीतून सोलापूर जिल्ह्यातील एका गावात एमडीची फॅक्टरी असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा कक्ष ९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक आणि पथकाने १५ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरात एका फॅक्टरीवर छापा टाकला. छाप्यादरम्यान कारखान्यातून सहा कोटी रुपये किंमतीचे तीन किलो एमडी सापडले. याशिवाय कारखान्यात एमडी बनवण्याचे 100 कोटींचे रसायन सापडले होते.

हेही वाचा -

  1. Action On Drugs : दया नायक यांची धडक कारवाई; ड्रग्जचा कच्चा माल आणि १६ कोटींचे एमडी जप्त, दोघांना अटक
  2. MD drugs seized : सोलापूरला पुन्हा ड्रग्जचा अड्डा ; ड्रग्ज डीलर छोटूच्या उत्तरप्रदेशातून आवळल्या मुसक्या, एक कोटींचं एमडी ड्रग्स जप्त
  3. Nashik Drug Case: 25 कोटींचे एमडी ड्रग्स नाशिकहून साकीनाका पोलिसांनी केले जप्त...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.