मुंबई - राज्यात कोरोनाची लाट ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी गंभीर असल्याचे बोलले जातं आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने पूर्व तयारी केली आहे. यात लहान मुलांसाठी टास्क फोर्सची बांधनी केलीय. तर दुसरीकडे नागरिक लहान मुलांना तापाची लागण होऊ नये म्हणून फ्लूवरील लस देण्यात आली आहे. हे लसीकरण मुलूंडच्या आयट्मोस्फेअर सोसायटीत राबविण्यात आले. या निर्णयाचे स्वागत टास्क फोर्सच्या सदस्यांकडून करण्यात आले आहे.
प्रत्येकानं बूस्टर डोस लहान मुलांना द्यायला हवा
टास्क फोर्स सदस्य डॉक्टर सुभाष साळुंखे यांनी या सोसायटीचं कौतुक केल आहे. ते म्हणाले, सोसायटीकडून उचललेलं पाहून हे स्तुत्य आहे. कोरोना हा देखील एक फ्लू आहे. सध्याच्या वातावरणात अशा स्वरूपाचं पाहून हे पाऊल उचलण चांगलं आहे. प्रत्येकानं बूस्टर डोस लहान मुलांना द्यायला हवा. तसेच फ्लू वरील लस देखील दिली पाहिजे. जेणेकरून मुलांचं संरक्षण होईल.
..म्हणून फ्लू लसीकरण शिबिराचे आयोजन
मुलुंड येथील आयट्मोस्फेअर सोसायटीतील रहिवाशांनी कोरोनाची तिसरी लाटेतून लहान मुलांना त्रास होऊ नये, यासाठी लहान मुलांसाठी फ्लू लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. या लसीकरणचा फायदा 18 वर्षाच्या आतील लहान मुलांना होणार आहे. कारण अठरा वर्षाच्या आतील मुलांना कोविड प्रतिबंधक लस घेता येत नाही. यामुळे या लसीकरणचा फायदा या मुलांना होणार आहे. त्याबरोबर डॉक्टरांनी देखील लहान मुलांचे फ्लूचे लसीकरण करावे, असे आवाहन केले होते. या सोसायटीने उचललेल्या पावलानं तर नक्कीच आणखी सोसायटी देखील लहान मुलांच्या फ्लूच्या लसीकरणसाठी पुढाकार घेतील.
तिसर्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होणार
कोरोना रुग्णांची सध्या परिस्थिती ही आटोक्यात आली असली तरीही कोरोनाच्या तिसरा लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. या तिसर्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील लहान मुलांचे फ्लू लसीकरण शिबिर घ्यावे आणि पुढील होणाऱ्या समस्या टाळाव्या, असे सोशल मिडीया माध्यमातून सांगण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टरांशी विचारविनिमय करून सोसायटीमधील लहान मुलांसाठी फ्लू लसीकरण शिबिर राबिवले असल्याचे
संजय नायर यांनी सांगितले.
यामुळे सामान्य ताप येणार नाही
पावसाळ्यात खोकला आणि सर्दी ही लक्षणं सामान्य आहेत. पण सध्या चालू असणाऱ्या कोरोना सारख्या आजारात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचा मोहिमेचा फायदा नक्कीच आमच्या सोसायटीतील रहिवाशांना होणार आहे. कोरोनाच्या लक्षणेत देखील ताप येतो. यामुळे जर फ्लूचे लसीकरण केले तर सामान्य ताप येणार नाही व याचा फायदा लहान मुलांना होईल, असे या सोसायटीतील सदस्य देशमुख यांनी सांगितले.
लसीकरणाचा फायदा होणार
लहान मुलांच्या फ्लूचे लसीकरण सर्वांचे झाले पाहिजे. शाळकरी मुलांचे लसीकरण खूप गरजेचे आहे. सध्या कोविडची लाट सुरू आहे. आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये फ्लूचे लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे. या लसीकरणचा फायदा होणार आहे यामुळे सामान्य येणारा ताप हा नियंत्रणात राहील असे डॉक्टरांनी सांगितले.