ETV Bharat / state

ईव्हीएमवरचं भूत काही केल्या उतरेना! अनेक सामाजिक संघटना आझाद मैदानात

author img

By

Published : May 31, 2019, 8:01 AM IST

इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय जनता दल (धर्मनिरपेक्ष), आम आदमी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी घेतला होता. त्यानुसार मोदी सरकारच्या शपथविधीच्या वेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर निदर्शने करण्यात येणार होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली.

ईव्हीएम विरोधात आझाद मैदानात आंदोलन

मुंबई - निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन हॅक केल्या जाऊ शकतात. ईव्हीएम मशीनवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाव्यात, यासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आल्याची माहिती माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक करून भाजप सत्तेवर आल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार हेमंत टकले यांनी केला. याबाबत अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला. ईव्हीएमच्या मदतीने सत्तेत आलेले भाजप सरकार हे ‘ईव्हीएम सरकार’ आहे. त्यामुळे ‘ईव्हीएम सरकार’ आणि ‘ईव्हीएम पीएम’ हे हॅशटॅग वापरून संपूर्ण देशभरात तीव्र मोहीम उघडली जाईल, असे मिठीबोरवाला यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात जनआंदोलन उभारून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली.

Intro:मुंबई
निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या
ईव्हीएम मशीन हॅक केल्या जाऊ शकतात. ईव्हीएम मशीनवर आमचा विश्वास नाही. यामुळे निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाव्यात यासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यात आल्याची माहिती माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिली.Body:इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) विरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय जनता दल (धर्मनिरपेक्ष), आम आदमी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी घेतला होता. त्यानुसार मोदी सरकारच्या शपथविधीच्या वेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर निदर्शने करण्यात येणार होती. मात्र पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक करून भाजप सत्तेवर आल्याचा आरोप जेष्ठ पत्रकार हेमंत टकले यांनी केला. याबाबत अनेक पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला. ईव्हीएमच्या मदतीने सत्तेत आलेले भाजप सरकार हे ‘ईव्हीएम सरकार’ आहे. त्यामुळे ‘ईव्हीएम सरकार’ आणि ‘ईव्हीएम पीएम’ हे हॅशटॅग वापरून संपूर्ण देशभरात तीव्र मोहीम उघडली जाईल, असे मिठीबोरवाला यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात जनआंदोलन उभारून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

बी जी कोळसे पाटील बाईट
आंदोलनाचे vis Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.