ETV Bharat / state

'एकनाथ खडसे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करू नका'

अंजली दमानिया यांनी आज (शनिवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर दमानिया बोलत होत्या. यावेळी बोलताना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजले. अशा माणसाला पुन्हा राजकारणात आणणे ही संतापजनाक बाब असल्याने राज्यपालांची भेट घेऊन खडसे यांची नियुक्ती विधानपरिषदेवर करू नये, अशी मागणी केल्याची माहिती दमानिया यांनी दिली.

social activist anjali damaniya
अंजली दमानिया
author img

By

Published : Oct 31, 2020, 6:38 PM IST

Updated : Oct 31, 2020, 7:22 PM IST

मुंबई - भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांची नियुक्ती राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर केली जाणार आहे. ही नियुक्ती केली जाऊ नये, म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना एक पत्र देऊन विनंती केली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. तसेच वेळ पडल्यास या प्रकरणी कोर्टातही जाऊ, असा इशारा दमानिया यांनी दिला.

अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

अंजली दमानिया यांनी आज (शनिवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर दमानिया बोलत होत्या. यावेळी बोलताना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून एकनाथ खडसे यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजले. अशा माणसाला पुन्हा राजकारणात आणणे ही संतापजनाक बाब असल्याने राज्यपालांची भेट घेऊन खडसे यांची नियुक्ती विधानपरिषदेवर करू नये, अशी मागणी केल्याची माहिती दमानिया यांनी दिली.

खडसे यांना संस्कृती आहे की नाही -

खडसे यांची नियुक्ती विधानपरिषदेवर झाली तर भ्रष्टाचारविरोधी लढ्याला काहीच अर्थ राहणार नाही. खडसे जी भाषा वापरत आहेत त्याच्याविरोधात राज्यपालांना निवेदन दिले आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताना खडसे यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर 'बाई दिली नाही, मागे लावली' असे शब्द वापरणारे खडसे यांना काही संस्कृती आहे की नाही, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवारांनी पाठीशी घातले -

खडसे जी भाषा वापरत होते, त्याबाबत शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी संदेश पाठवला. पवार यांनी तुमचं नाव घेतले नाही, असे सांगून खडसे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना एका महिलेबद्दल असभ्य बोलल्याचे सांगितल्यावर मी मुंबईत आल्यावर भेटतो, असे पवारांनी सांगितले. याप्रकरणी मी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याने आज राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांना आणखी पुरावे देणार आहे आणि याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले.

हेही वाचा - 'भाजपवर टीका करणे ही संजय राऊत यांची "ड्यूटी", शरद पवारच राज्य चालवतात केले मान्य'

काय आहे नेमके प्रकरण -

एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशदारम्यान खडसे यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर 'बाई दिली नाही, मागे लावली' असे शब्द वापरले होते. खडसे यांनी हे वक्तव्य अंजली दमानिया यांच्याबाबत केले होते. अशी भाषा वापरणे एका महिलेचा अपमान असल्याने अंजली दमानिया यांनी राज्यपालांची भेट घेऊन खडसे यांना विधान परिषदेवर नियुक्त करू नये, अशी मागणी केली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारींनी दमानिया यांनी दिलेले निवेदन स्वीकारले आहे. आणखी जे काही पुरावे आहेत ते त्यांना हवे आहेत. हे पुरावे उद्या (रविवारी) किंवा परवापर्यंत (सोमवार) पाठवून देणार असल्याचे दमानियांनी सांगितले.

Last Updated : Oct 31, 2020, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.