ETV Bharat / state

महाराष्ट्र दौरा : नरेंद्र मोदींच्या 'या' शहरात होणार सभा, स्मृती इराणींची माहिती

राहुल गांधी देशभरात जिथे प्रचारासाठी गेले तिथे काँग्रेसचा पराभव झालेला आहे. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रात होईल. असे मत भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची माहिती देण्यासाठी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

राहुल गांधी जिथे प्रचाराला जातात तिथे काँगेसचा पराभव - स्मृती इराणी
author img

By

Published : Oct 11, 2019, 10:52 PM IST

Updated : Oct 11, 2019, 11:48 PM IST

मुंबई - राहुल गांधी देशभरात जिथे प्रचारासाठी गेले तिथे काँग्रेसचा पराभव झालेला आहे. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रात होईल. असे मत भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांनी शुक्रवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

राहुल गांधी जिथे प्रचाराला जातात तिथे काँगेसचा पराभव - स्मृती इराणी

हेही वाचा - मोदींनी मुंबई दहशतवाद मुक्त केली; योगी आदित्यनाथ यांचा दावा

राहुल गांधी काँगेसच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येत असतील तर त्यांच स्वागत करायला हवं. मात्र, त्याआधी त्यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. देशाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या परदेशी संस्थाच त्यांनी समर्थन का केलं? देशात कोणत्याही निवडणुका नसताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान का केला गेला? आणि जेएनयूच्या कॅम्पसमध्ये भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्यांच काँगेसकडून समर्थन कस केलं गेलं? असा प्रश्न स्मृती इराणी यांनी विचारला आहे. मोदी हे कायम सकारात्मक राजकारण करतात. मात्र, राहुल किती सकारात्मक राजकारण करतात हे मला चांगले माहीत असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा - 17 दिवसांपासून सरकार झोपलेले का? पीएमसीवरुन चरणसिंगांचा हल्लाबोल

मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची माहिती

स्मृती इराणी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची माहिती माध्यमांना दिली.

रविवारी 13 ऑक्टोबर रोजी भंडाऱ्यातील जळगाव साकोली येथे मोदींची पहिली प्रचारसभा पार पडेल.

त्यानंतर 16 ऑक्टोबरला अकोला, जालन्यातील परतुर आणि नवी मुंबईतील ऐरोलीत मोदींची सभा पार पडेल.

गुरुवार 17 ऑक्टोबरला बीडमधील परळी, सातारा आणि पुण्यात मोदींची प्रचारसभा पार पडेल.

शुक्रवारी 18 ऑक्टोबरला मुंबईतील बीकेसी मधील एमएमआरडीए मैदानात मोदींची प्रचारसभा पार पडेल.

अशी माहिती स्मृती इराणी यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

हेही वाचा - मतदारांसाठी 'फ्लॅश मॉब'द्वारे जनजागृती; मुंबईकरांसाठी अनोखा उपक्रम

आरेबाबत सावध भूमिका

स्मृती इराणी यांना यावेळी एक मुंबईकर म्हणून आरेबाबत काय भूमिका आहे. असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा विकास आणि पर्यावरण या दोन्हींचा योग्य समतोल राखणारा आमचा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र सरकारची तीच भूमिका आहे. मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आणि आमचे मित्रपक्ष एकत्र आहोत असे सांगत शिवसेनेच्या विरोधी भूमिकेवर बोलणे त्यांनी मोठ्या शिताफीने टाळले.

Intro:राहुल गांधी देशभरात कुठेही प्रचारासाठी गेले तिथे तिथे काँग्रेसचा पराभव झालेला आहे. महाराष्ट्रात त्याचीच पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल अस मत भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी व्यक्त केलं. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांनी आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

राहुल गांधी काँगेसच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येत असतील तर त्याच स्वागत करायला हवं मात्र त्याआधी त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. देशाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या परदेशी संस्थाच त्यांनी समर्थन का केलं, देशात कोणत्याही निवडणुका नसताना सवतत्र्यवीर सावरकर यांचा अपमान का केला गेला, आणि जेएनयूच्या कॅम्पसमध्ये भारत तेरे तुकडे होंगे पचास म्हणणार्याच काँगेसकधून समर्थन कस केलं गेलं असा प्रश्न स्मृती इराणी यांनी विचारला. मोदी हे कायम सकारात्मक राजकारण करतात मात्र राहुल किती सकारात्मक राजकारण करतात हे मला चांगलं माहीत असल्याचं त्याने सांगितले..

मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची माहिती

स्मृती यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची माहिती मद्यमना दिली..
रविवारी 13 ऑक्टोबर रोजी भडाऱ्यातील जळगाव साकोली येथे मोदींची पहिली प्रचारसभा पार पडेल.

त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी अकोला, जालन्यातील, परतुर आणि नवी मुंबईतील ऐरोलीत मोदींची सभा पार पडेल.

गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी बीडमधील परळी आणि सातारा आणि पुण्यात मोदींची प्रचारसभा पार पडेल.

शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी मुंबईतील बीकेसी मधील एमएमआरडीए मैदानात मोदींची प्रचारसभा पार पडेल अशी माहिती स्मृती इराणी यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

आरेबाबत सावध भूमिका

स्मृती इराणी याना यावेळी एक मुंबईकर म्हणून आरेबाबत काय भूमिका आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा विकास आणि पर्यावरण या दोन्हीचा योग्य समतोल राखणारा आमचा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस याच्या महाराष्ट्र सरकारची तीच भूमिका आहे. मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आणि आमचे मित्रपक्ष एकतर आहोत अस सांगत शिवसेनेच्या विरोधी भूमिकेवर बोलन त्यांनी मोठ्या शिताफीने टाळलं.

Body:.

Conclusion:.
Last Updated : Oct 11, 2019, 11:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.