ETV Bharat / state

मुंबई उपनगरात विविध ठिकाणी पुन्हा गॅस गळती; गूढ वाढले, आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेची यंत्रणा तैनात

author img

By

Published : Oct 17, 2020, 9:41 PM IST

मुंबईत आज (शनिवार) घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, गोवंडी, मुलुंड, पवई परिसरात गॅस गळतीच्या दुर्गंधीने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा घबराट पसरली. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गॅस गळतीची दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागात फोन करून तक्रारी दिल्या. मात्र, पथकाने तपासणी केली असता गॅस गळती नेमकी कुठे झाली हे स्पष्ट झाले नाही.

file photo
संग्रहित छायाचित्र

मुंबई - मुंबईच्या उपनगरात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात गॅस गळतीच्या वासाने घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, गोवंडी, मुलुंड, पवई परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्यावेळी कुठेही गॅस गळती झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. आज (दि. 17 ऑक्टोबर) पुन्हा तसाच प्रकार निदर्शनास आला आहे. मागच्या वेळेप्रमाणे यंदाही गॅस गळती कुठे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे मुंबईमधील गॅस गळतीचे गूढ वाढत चालले आहे.

मुंबईत आज (शनिवार) घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, गोवंडी, मुलुंड, पवई परिसरात गॅस गळतीच्या दुर्गंधीने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा घबराट पसरली. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गॅस गळतीची दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागात फोन करून तक्रारी दिल्या. यानंतर पालिकेने तातडीने संबंधित प्रकाराचा तपास केला. मात्र, दोन तासांतच हा प्रकार बंद झाला. दरम्यान, आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेने अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकासह यंत्रणा तैनात ठेवण्यात आल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदळे यांनी दिली.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड परिसरात अचानक सायंकाळच्या सुमारास गॅस गळतीची दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांची घबराट उडाली. रहिवासी-दुकानदार बाहेर आले. पालिकेच्या आपत्कालीन विभागात याबाबत सुमारे 10 फोन आले. यानंतर तातडीने संबंधित विभागात पालिकेच्या माध्यमातून ‘हॅजमॅट व्हॅन’, ‘गॅस डिटेक्टर’च्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही ठिकाणी गॅसगळती आढळली नाही. त्यामुळे संबंधित गॅस दुर्गंधीबाबत नागरिकांमध्ये अजूनही भितीचे वातावरण आहे. दरम्यान, संबंधित भागात जूनमध्येही असा प्रकार घडला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्यही अशीच घटना घडली होती. मात्र, संबंधित भागातील कोणत्याही गॅस कंपनीने गॅस गळती झाल्याचे स्पष्ट केले नव्हते. शिवाय पालिकेलाही गॅस गळती सापडली नव्हती. त्यामुळे गॅस दुर्गंधीबाबत गूढ निर्माण झाले आहे.

हेही वाचा - दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरू करण्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.