ETV Bharat / state

राज्यातील कारागृहात आतापर्यंत 6 कैद्यांसह 6 कारागृह कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्य कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तब्बल 3059 कारागृह कर्मचाऱ्यांची तर २३ हजार ९६४ कैद्याची कोरोना चाचणी घेण्यात आलेली होती. ज्यामध्ये 526 कारागृह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर 2362 होती. यामध्ये, तब्बल 503 कारागृह कर्मचारी तर 2264 कैदी हे पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यभरातील वेगवेगळ्या कारागृहातून 6 कारागृह कर्मचाऱ्यांचा आणि 6 कैद्याचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

author img

By

Published : Nov 2, 2020, 3:47 PM IST

Updated : Nov 2, 2020, 3:58 PM IST

prisoners died due to corona
6 कैद्यांसह 6 कारागृह कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई- कोरोनाचे संक्रमण राज्यातील कारागृहात पसरू नये म्हणून राज्य शासनाकडून राज्यातील एकूण कारागृहातील कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये आज घडीला एकूण 23 हजार 964 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत 2362 कैदी हे कोरोना संक्रमित आढळून आलेले आहेत. यापैकी जवळपास 2264 कैदी हे उपचारानंतर बरे झालेले आहेत .

राज्य कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तब्बल 3059 कारागृह कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आलेली होती. ज्यामध्ये 526 कारागृह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये, तब्बल 503 कारागृह कर्मचारी हे पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यभरातील वेगवेगळ्या कारागृहातून 6 कारागृह कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुंबईत मध्यवर्ती कारागृहात एकही कोरोना कैदी किंवा कारागृह कर्मचारी नाही-राज्यात सर्वाधिक कोरोना संक्रमित कैदी हे मुंबईतील मध्यवर्ती कारागृह म्हणजेच आर्थर रोड कारागृहात आढळून आले होते. आर्थर रोड कारागृहात 1295 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर यात तब्बल 184 कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यातील आतापर्यंत 184 कैदी हे उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. सुदैवाने आर्थर रोड कारागृहात एकाही कैद्याचा मृत्यू झालेला नाही. तर दुसरीकडे आर्थर रोड कारागृहातील 152 कारागृह कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. ज्यात 52 कारागृह कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाली होती. यातील सर्व 52 कर्मचारी हे बरे झाले आहेत.कोरोनामुळे कैद्यांचा मृत्यू झालेली कारागृह-पुणे- पुण्यातील येरवडा कारागृहात 2505 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यात 299 कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असता, यात उपचारानंतर आतापर्यंत 280 कैदी बरे झाले असून 2 कैदी, 1 कारागृह कर्मचारी अशा एकूण 3 जणांचा मृत्यू झाला आहे.धुळे - धुळे जिल्हा कारागृहात एकूण 514 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील 48 कोरोना संक्रमित कैदी आढळून आले आतापर्यंत 42 कैदी कोरोनातून बरे झाले असून एका कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अमरावती - अमरावती मध्यवर्ती कारागृहात 1176 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता, यात कोरोना संक्रमित 136 कैदी आढळून आले. त्यापैकी 121 कैदी आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले असून 1 कैदी व 1 कारागृह कर्मचारी असे 2 जण मृत्युमुखी पडले आहेत.नवी मुंबई - येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात 2509 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली . ज्यात 4 कोरोना संक्रमित कैदी आढळून आले असता, यातील आतापर्यंत एक कैदी बरा झाला असून 2 कैदी आणि एका कारागृह कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.अमरावती कारागृह - या कारागृहात 1176 कैदी व 28 कारागृह कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली असता, 136 कैदी आणि 5 कारागृह कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले असून यात 1कैदी व 1 कारागृह कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडला आहे. नाशिक - बोरसल स्कूल कारागृहात दोन कारागृह कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले असून यामध्ये एका कारागृह कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.वाशिम- जिल्हा कारागृहात 8 कारागृह कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाली असता, यामध्ये 1 कारागृह कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोनाच्या मुद्यावर पॅरोल , व जामिनावर सोडण्यात आलेले कैदी- सुरुवातीला राज्यातील 17 हजार कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन सोडण्यात आले होते. यानंतर यासाठी नेमण्यात आलेल्या हाय पावर कमिटीच्या 25 मार्च सूचनेनुसार तब्बल 5105 कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले. तर राज्य शासनाच्या 8 मे 2020 च्या आदेशानुसार राज्यातील तब्बल 2575 कैद्यांना आपात्कालीन पॅरोल मंजूर करण्यात आला होता. याबरोबरच 11 मे 2020 च्या हायपावर कमिटीच्या सूचनेनुसार 3017 कैद्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. सध्याच्या घडीला राज्यातील कारागृहातील 10697 कैद्यांना कोरोना संक्रमणामुळे तात्पुरता जामीन मंजूर झाला आहे.राज्यात पूर्व-पश्चिम उत्तर-दक्षिण अशी कारागृहामध्ये विभागणी केली असून यामध्ये 46 कारागृहांमध्ये सध्याच्या घडीला 23 हजार 217 कैद्यांची क्षमता असलेली कारागृह आहेत .मात्र या ठिकाणी आताच्या घडीला 28104 कैदी हे ठेवण्यात आलेले आहेत. कोरोना संक्रमण पाहता सध्याच्या घडीला राज्यातील एकूण कारागृहांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक कैदी असल्याचे समोर येत आहे. पश्चिम कारागृह क्षेत्र- पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये 2449 कैदी ठेवण्याची क्षमता आहे. पण, सध्याच्या घडीला या ठिकाणी चार हजार 582 कैदी ठेवण्यात आलेले आहेत.मध्ये कारागृह क्षेत्र - औरंगाबाद मध्य कारागृहात 539 क्षमता असलेल्या कारागृहात 1331 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. दक्षिण कारागृह क्षेत्र - मुंबई मध्य कारागृहामध्ये 804 कैद्यांची क्षमता असताना या कारागृहामध्ये 1609 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. तर ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये 1105 कैद्यांची क्षमता आहे , त्याठिकाणी 2379 कैद्यांना सध्याच्या घडीला ठेवण्यात आलेले आहेत. असाच काहीसा प्रकार तळोजा मध्यवर्ती कारागृहात असून 2124 कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात 3471 कैदी सध्याच्या घडीला ठेवण्यात आलेले आहेत. कल्याण मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 540 कैद्यांची असतानाही या ठिकाणी 1490 कैदी ठेवण्यात आलेले आहेत.पूर्व कारागृह क्षेत्र - नागपूर मध्यवर्ती कारागृहात 1810 कैद्यांची क्षमता असलेल्या कारागृह आहे याठिकाणी 2103 कैदी ठेवण्यात आलेले आहेत.

Last Updated : Nov 2, 2020, 3:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.