मुंबई -कोरोनाबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे पत्र पाठविले आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे यात म्हटले आहे. दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय आरोग्य पथकाने राज्यात पाहणी केली. यात १३ मुद्यांवर केंद्राने लक्ष वेधले आहे. राज्यात वाईट स्थिती आहे, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. आरोग्य स्थिती चांगली असली तरी राज्यातील परिस्थिती गंभीर आहे, असे यात म्हटले आहे.
केंद्राच्या राज्य सरकारला सूचना -
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्याची सूचना
- डेथ ऑडीट पुन्हा सुरू करण्याची सूचना
- नाईट कर्फ्यूचा फरक पडत नाही.
- कन्टेन्मेन्ट झोनची प्रक्रिया पुन्हा राबवावी
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक नियम लागू; राज्य सरकारचे अध्यादेश