मुंबई - सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्स अँगल समोर आल्यावर नार्कोटिक्स ब्युरोकडूनही चौकशी केली जात आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची नार्कोटिक्स ब्युरोकडून चौकशी केली जात आहे. त्याचवेळी सीबीआयकडून आज (दि. 6 सप्टें) बंटी सचदेव व रुग्णवाहिकेच्या चालकाची चौकशी केली जात आहे.
या प्रकरणाची नार्कोटिक्स विभागाकडूनही चौकशी केली जात आहे. एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स ब्युरोने सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंतला अटक केली होती. यापूर्वी शुक्रवारी (दि.4 सप्टें) सुशांतची प्रेयसी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने अटक केली होती. एनसीबीने या प्रकरणात सात जणांना अटक केली आहे. यातील शोविक, सॅम्युअल आणि झैद हे तिघे पोलीस कोठडीत आहेत. शनिवारी (दि. 5 सप्टें) एनसीबीने दिपेश सावंत याला अटक केली आहे. आज(दि. 6 सप्टें) या प्रकरणी रिया चक्रवर्तीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
दरम्यान, सांताक्रूझ वाकोला येथील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे आज बंटी सचदेव याला तिसऱ्यांदा सीबीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. सुशांत सिंहची मॅनेजर असलेली दिशा सालीयन ही याच बंटी सचदेवच्या कॉर्नर स्टोअर कंपनीत कामाला होती. दिशा सालीयन हिचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशीही सीबीआय करत आहे. आज सुशांतसिंहचा मृतदेह घरापासून रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेचा मालक विशाल बनकर याचीही दोन तास चौकशी सीबीआयने केली आहे. तर आज सुशांतची बहीण मीतू सिंह आपला जबाब नोंदवण्यासाठी डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआयपुढे हजर झाली आहे. तर काही वेळात सुशांतसिंह याचा मित्र म्हणून सर्वांना ओळख सांगणारा संदिप सिंहही सीबीआयपुढे चौकशीसाठी हजर राहणार आहे.
हेही वाचा - रियाने जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतलेली नाही - अॅड. सतीश मानेशिंदे