ETV Bharat / state

Help Service: रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा; हा ध्यास घेऊन गेल्या 30 वर्षापासून मदत सेवा सुरु

Help Service: अनेकवेळा परराज्यातून किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना प्रशासकीय काम इतर वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी मदतीची गरज असते. ही मदतीची गरज गेल्या 30 वर्षापासून विजय नाटेकर आणि त्यांची टीम करत आहे.

Help Service
Help Service
author img

By

Published : Nov 19, 2022, 4:38 PM IST

मुंबई: मुंबई परिसरात असणाऱ्या शासकीय रुग्णालयात राज्यभरातूनच नाहीतर देशभरातून रुग्णांचा येण्याचा ओढा आहे. अनेकवेळा परराज्यातून किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना प्रशासकीय काम इतर वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी मदतीची गरज असते. हीच मदतीची गरज गेल्या 30 वर्षापासून विजय नाटेकर आणि त्यांची टीम देत आहे.

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा

टीम मदतीसाठी २४ तास: मुंबईतील परळ या भागामध्ये केईएम टाटा हॉस्पिटल आणि वाडिया सारखे मोठे दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये राज्यातूनच नाहीतर, देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. अनेकवेळा रुग्ण राज्यातून आणि देशातून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना नेमकं हॉस्पिटलमध्ये कुठे धावपळ करायची. ऍडमिशन घेण्याची प्रक्रिया काय आहे. इतर वैद्यकीय चाचण्या कुठे केल्या जातात. या सोबतच मानसिक आधाराची गरज आहेत. अशावेळी केईएम रुग्णालयामध्ये विजय शंकर नाटेकर आणि त्यांची टीम मदतीसाठी २४ तास असते.

कागदपत्रांची पूर्तता: अनेकवेळा रुग्ण हा अत्यंत नाजूक परिस्थितीत असतो. त्याच्यासोबत बाहेरून आलेले नातेवाईक एका किंवा दोन व्यक्ती असतात. अनेकवेळा नातेवाईकही भांबावलेल्या स्थितीत असतात. नेमकं हॉस्पिटल परिसरामध्ये कोठे काय आहे ? कोठे कोणत्या टेस्ट केल्या जातात. कागदपत्रांची पूर्तता कशी केली जाते. त्यासाठी कोठे जावं लागतं याबाबत अधिक नसलेले नातेवाईक यांना मदत करण्याचं मोलाचे काम विजय शंकर नाटेकर आणि त्यांच्या टीमकडून केला जातो.

दिलेल्या मदतीमुळे आधार: गेल्या 30 वर्ष विजय शंकर नाटेकर आणि त्यांची ही पूर्ण टीम "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" हा ध्यास घेऊन काम करत आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या कठीण काळात आपली मदत होईल. कठीण काळात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपण दिलेल्या मदतीमुळे आधार मिळतो. रुग्ण बरा झाल्यानंतर आपणही यामध्ये उचललेल्या खारीच्या वाटायचं समाधान आम्हाला मिळत. आणि त्या समाधानासाठीच आम्ही गेल्या 30 वर्षापासून काम करत आहोत, असं विजय शंकर नाटेकर बोलताना सांगतात.

अशी झाली मदतीची सुरुवात: केईएम रुग्णालयात उपचारासाठी राज्यभरातून पूर्वीपासूनच लोक येत होती. 30 वर्षांपूर्वी हॉस्पिटल परिसरामध्ये अनेक साधनांची कमी होती. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आणि नातेवाईकांना अनेक वेळा धावपळ करावी लागत होती. त्यामुळे याच परिसरात असणारे विजय नाटेकर, शरद श्रीधर जुईले, काशीराम मुग्दार, अशोक शेडगे यांनी रुग्णांना आणि नातेवाईकांना या परिस्थितीत मदत करण्याच ठरवलं.

टीममध्ये 32 जण हे मदतीचा कार्यरत: तेथूनच या टीमची ही मदत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांच्या टीममध्ये 32 जण हे मदतीचा कार्य करत होते. मात्र आता ही संख्या कमी होऊ लागली आहे. आता जवळपास आठ ते नऊ जण या टीममध्ये कार्यरत आहेत. काही तरुण त्यांच्या टीमशी जोडले जात आहेत. मात्र मदतीचा ओघ काहीसा नक्कीच कमी झाला आहे. त्यामुळे आपण रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे मानून जो विडा उचलला आहे. त्याचा वसा तरुण पिढीने देखील घ्यावा, असं मत विजय शंकर नाटेकर व्यक्त करतात.

जखमी गोविंदा ना मदतीचा हात: मुंबईत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र दहीहंडी उत्सव साजरा करताना अनेक गोविंदा जखमी होण्याच्या घटना होत असतात. जखमी गोविंदांना खास करून मुंबईच्या केईएम रुग्णालयात आणलं जात. तेथे देखील विजय शंकर नाटेकर यांची टीम दरवर्षी मोलाचं मदत कार्य करत असते. त्या संपूर्ण दिवसभर विजय शंकर नाटेकर यांची टीम केईएम रुग्णालयाच्या बाहेर तैनात असते. जखमी गोविंदा येतात, त्याला त्वरित उपचार कसे उपलब्ध होतील. यासाठी मदत कार्य त्यांच्या सुरू असतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.