मुंबई- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील रुग्णालयांना रक्ताची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन अनेक ठिकाणी सुरक्षित रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सिद्धीविनायक मंदिर न्यासाने देखील आजपासून मंदिर परिसरात रक्तदान शिबिराला सुरुवात केली आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी स्वत: पासूनच या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
रुग्णांच्या मदतीसाठी सर्वांनी अशा सुरक्षित रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन सिद्धीविनायक मंदिर न्यासाने केल आहे. मंदिर न्यासाने रक्त संकलन करणारी रुग्णवाहिका तयार केली आहे. ही रुग्णवाहिका थेट रक्तदात्यांच्या घरी जाऊन रक्तसंकलन करणार आहे. आज प्रभादेवी परिसरात १५ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. दिवसाला ५० बाटल्या रक्तसंकलन करण्याची योजना आहे. संकलन केलेले रक्त जे. जे. रक्तपेढीमध्ये जमा होणार असल्याचे सिद्धीविनायक न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.
हेही वाचा- युवीसह हरभजनचा पाक क्रिकेटपटूला पाठिंबा; भाजप आमदाराने केली विधान मागे घेण्याची मागणी