मुंबई - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते. शेंदूर लेपन करण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली दर्शनाची सेवा सोमवारी सकाळपासून पूर्ववत करण्यात आली आहे.
हेही वाचा - दीपिका पदुकोणने घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन
माघी गणेशोत्सव सुरू होत असल्यामुळे दिल्लीतील एका भाविकाने जवळपास ३५ किलो सोन्याचा मुलामा असलेला दरवाजा आणि गाभाऱ्यातील घुमट बाप्पाच्या चरणी अर्पण केला. त्यामुळे आता भाविकांना सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्याचे रूप बदललेले पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - 'पाथरीतील 150 वर्षापूर्वीचे लिंबाचे झाड हे साईबाबांचे निशाण'
सकाळी आरती आणि पूजा, पाठ करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
हेही वाचा - पाथरी जन्मस्थान तर शिर्डीला साईंची समाधी - प्रताप पाटील-चिखलीकर