मुंबई: मुंबई सायबर सेलने उत्तराखंडमधून अटक केलेली आरोपी श्वेता सिंगचा जामीन अर्ज बांद्रा कोटाने फेटाळल्यानंतर श्वेता सिंगच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने मुंबई सायबर सेलला या प्रकरणात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. सायबर सेलने रिप्लाय सादर करत श्वेता सिंगच्या जामीनला विरोध केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
बुली बाई ॲप प्रकरणात श्वेता सिंग यांना उत्तराखंडमधून मुंबई सायबर सेलने अटक केले होते. या प्रकरणात पहिला आरोपी विशाल झा याला बेंगलोर मधून अटक केल्यानंतर त्याच्या माध्यमातून श्वेता सिंग ला उत्तराखंडमधून अटक करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी 7 जानेवारी रोजी श्वेता सिंगला मुंबईत आल्यानंतर 3 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली होती, त्यानंतर तीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
बुली बाई एक असे ॲप्लिकेशन आहे जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो टाकले जात होते तसेच त्यांची बोली लावली जात होती. या ॲपवर आतापर्यंत 102 मुस्लिम महिलांचे फोटो टाकण्यात आले होते. या प्रकरणावरुन विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच अनेकांनी या ॲप विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या आरोपीं विरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केरत तपास सुरु केला होता.