ETV Bharat / state

शुटिंगनंतर श्रेयस तळपदेला उच्च रक्तदाबाचा त्रास, रुग्णालयात उपचार सुरू - Shreyas Talpade Health update

Shreyas Talpade Hospitalized : अभिनेता श्रेयस तळपदेला उच्च रक्त दाबामुळं मुंबईतील अंधेरीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला आज रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.

मराठी अभिनेता श्रेयस तळपदे
मराठी अभिनेता श्रेयस तळपदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 6:54 AM IST

Updated : Dec 15, 2023, 7:02 AM IST

मुंबई Shreyas Talpade Hospitalized : अभिनेता श्रेयस तळपदेला उच्च रक्तदाबामुळं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. श्रेयस हा 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंग संपल्यानंतर तो घरी पोहोचला. तेव्हा छातीत दुखू लागल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं.

  • श्रेयस तळपदेला हृदयविकारामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची सोशल मीडियात चर्चा आहे. श्रेयस तळपदेला हृदयविकारामुळे नव्हे तर उच्च रक्तदाबामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचं श्रेयसच्या सेक्रेटरीनं सांगितलं आहे.

नेमकं काय घडलं : श्रेयस हा गुरुवारी वेलकम टू जंगल या सिनेमाच्या शुटींगला गेला होता. त्याच्या वेळेनुसार तो सेटवरही पोहचला होता. तो सेटवर सगळ्यांशी व्यवस्थित आणि हसून-खेळून बोलत होता. त्यानं दिवसभर शुटींगही केलं. तो पूर्णपणे ठीक होता. त्यानं काही अ‍ॅक्शन शॉट्सदेखील शूट केले. त्यानंतर तो घरी परतला. त्यानं त्याची पत्नी दिप्तीला सांगितलं की, थोडं अस्वस्थ वाटतंय. यानंतर तिनं श्रेयसला तातडीनं रुग्णालयात नेलं. उपचारांनंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.

आतापर्यंत 45 हून अधिक चित्रपटांमध्ये काम : श्रेयसनं आतापर्यंत मराठी रंगभूमी, छोटा पडद्यावर तसंच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडलीय. त्यानं त्याच्या आतपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये 45 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. श्रेयसची भूमिका असलेला कौन प्रवीण तांबे हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर चांगलाच गाजला होता. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेला पुष्पाही खूप गाजला. त्यानं हिंदीतही अनेक रेकॉर्ड्स केले. त्या चित्रपटातील अल्लू अर्जुनसाठी हिंदी भाषेतील डबिंग श्रेयस तळपदेनं केलं होतं. त्याची खूप प्रसंशाही झाली होती. किंबहुना पुष्पा हिंदीत सुपरहिट होण्यात श्रेयसच्या डबिंगचा मोठा वाटा होता. आता पुष्पाचा दुसरा भाग येणार आहे. श्रेयस यावेळेस काय कमाल करतो याकडे फिल्म इंडस्ट्री आणि प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा :

  1. Shreyas Talpade Cleanliness Campaign : श्रेयस तळपदेच्या उपस्थिती वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान; पाहा व्हिडिओ
  2. Shreyas Talpade reveals : बहुतेक चित्रपटासाठी दुसरी निवड असल्याचा श्रेयस तळपदेने केला खुलासा

Last Updated : Dec 15, 2023, 7:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.