ETV Bharat / state

Shraddha Walkar Case : श्रद्धा वालकर केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी; चाकणकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाकडे मागणी

श्रद्धा वालकर ( Shraddha Walkar ) या तरुणीची हत्या तिचा प्रियकर आफताब पूनावला यांनी दिल्लीत केली आहे. आरोपी आफताब पूनावला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी सर्व स्तरातून मागणी केली जातेय.

Shraddha Walkar Case
चाकणकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाकडे मागणी
author img

By

Published : Nov 16, 2022, 1:07 PM IST

मुंबई : वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर ( Shraddha Walkar ) या तरुणीची हत्या तिचा प्रियकर आफताब पूनावला यांनी दिल्लीत केली आहे. श्रद्धा पालकर हिच्या मृतदेहाचे 35 तुकडे ( 35 pieces of corpse ) करून दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात फेकून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न तिचा प्रियकराने केला होता. श्रद्धा वालकर हत्याकांडाने दिल्ली आणि महाराष्ट्रच नाही तर, संपूर्ण देश हादरला आहे. आरोपी आफताब पूनावला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी सर्व स्तरातून मागणी केली जातेय.

तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ( President Rupali Chakankar )यांनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी पावले उचलले आहेत. राज्य महिला आयोगाच्या ( State Commission for Women ) अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिले असून, ही हत्या म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी यासाठी या घटनेचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रीय महिला आयोगाला लिहले आहे.

आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी : राष्ट्रिय महिला आयोगाने या प्रकरणात अधिक लक्ष घालून पोलिसांनी लवकरात लवकर चार्ज शिट दाखल केली पाहिजे. या प्रकरणात आधीच सहा महिने उशीर झाला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अजून उशीर होऊ नये यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर कोर्टात चालवणे आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.