मुंबई - दिल्लीमधील हत्याकांडातील श्रद्धा वाळकरचे वडील विकास वाळकर, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर पोहचले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हेसुद्धा त्यांच्याबरोबर आहेत.
फडणवीस यांची भेट झाल्यानंतर पत्रकार परिषदेत विकास वाळकर यांनी झालेल्या चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले की, दिल्ली आणि वसई पोलीस यांचा संयुक्त तपास योग्य पद्धतीने सुरू (Shraddha Murder Case)आहे. आफताबच्या कुटुंबाचाही सखोल तपास (Aftab family investigated) व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले (Devendra Fadnavis justice assurance) आहे. आफताब व त्याच्या कुटुंबियांना कठोर शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे.
नीलम गोऱ्हे आणि किरीट सोमय्या यांनी घरी येऊन मला धीर दिला त्याबद्दल त्यांचे आभार वाळकर यांनी मानले. जेवणाचा आणि इतर खर्च किरीट सोमय्या यांनी केला. दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस यांचे संयुक्तपणे काम सुरू आहे. तुळींज पोलीस ठाण्याकडून सुरुवातीला असहकार्य मिळाले. अन्यथा माझी मुलगी आता जिवंत असती, असेही श्रद्धाच्या वडिलांनी म्हटले आहे.