ETV Bharat / state

Shraddha Walkhar Murder Case : आफताफ १५ दिवसांपूर्वी वसईला आला होता; नवीन माहिती उघडकीस - Before 15 days aftaf came to vasai

वसईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी (Shraddha Walkhar Murder Case Update) आरोपी आफताब पुनावाला अटकेत (Aftab Punawala Arrest) आहे. यामध्ये रोज नवनवीन खुलासे (Shraddha Walker murder new revelation) समोर येत आहेत. आरोपीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. Latest news from Mumbai, Mumbai Crime, Muslim boy killed Hindu girl Mumbai

Shraddha murder case Fifteen days ago accused Aftab come Vasai
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण
author img

By

Published : Nov 15, 2022, 7:52 PM IST

Updated : Nov 15, 2022, 9:12 PM IST

मुंबई : वसईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी (Shraddha Walkhar Murder Case Update) आरोपी आफताब पुनावाला अटकेत (Aftab Punawala Arrest) आहे. यामध्ये रोज नवनवीन खुलासे (Shraddha Walker murder new revelation) समोर येत आहेत. आरोपीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या अवयवाचे ३५ तुकडे करुन ते रोज एक एक अवयव जंगलात त्याने फेकले. त्यापैकी १० अवयव सापडले आहेत. Latest news from Mumbai, Mumbai Crime, Muslim boy killed Hindu girl Mumbai

आरोपी आफताबविषयी माहिती देताना आदिल खान

आफताबचे वडील मुंबईत शिफ्ट : दरम्यान आरोपी आफताफचे वडील अमीन पुनावाला हे आपल्या पत्नीसह वसई येथील युनिक पार्क सोसायटीमध्ये राहत होते. या सोसायटीचे अध्यक्ष आदिल खान यांनी माहिती दिली की, पंधरा दिवसांपूर्वीच आफताफचे वडील आणि आई यांनी येथील घर रिकामे करून मुंबईत शिफ्ट होतो असे सांगून निघून गेले. त्यामुळे आपल्या मुलाने मोठा गुन्हा केल्याचे कळाल्यानंतर आपले राहण्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय आफताबच्या पालकांनी घेतला तर नाही ना अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

श्रद्धा ही आफताबची वर्गमैत्रिण : सोसायटीचे अध्यक्ष आदिल खान यांनी सांगितले की, गेली 18 वर्षे आफताफचे आई-वडील या सोसायटीत राहत होते. आफताफ अधून-मधून घरी यायचा. त्याचे इथे कोणीही मित्र नाहीत. कोणाशीही भांडण नाही. मात्र, एका महिन्यापूर्वी पोलीस आफताफच्या आई-वडिलांकडे चौकशीसाठी आले होते. त्यानंतर आम्ही विचारणा केली असता अमीन पुनावाला यांनी सांगितले की, मुलगा दिल्लीला शिफ्ट झाला आहे आणि मुलीच्या पालकांनी तक्रार केल्याने पोलीस वेरिफिकेशनसाठी आले होते. त्याचप्रमाणे दीड वर्षांपूर्वी अधून मधून पंधरा दिवसांनी आफताफ आई-वडिलांना भेटायला या घरी येत असे त्यावेळी त्याच्यासोबत हत्या झालेल्या मुलीला पाहिले असल्याचे देखील खान यांनी सांगितले. त्यावर आफताबच्या पालकांना विचारले असता त्यांनी श्रद्धा ही आफताबची वर्गमैत्रिण असल्याचे त्यांनी सांगितले होते.

आफताफ वसईतील घरी येऊन गेला : महत्त्वाचे म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी आफताबच्या आई-वडिलांनी वसईतील घर खाली करून मुंबईला जातो असे सांगितले. त्यावेळी त्यांना खान यांनी घर खाली का करता असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, आफताफचा लहान भाऊ याला मुंबईत नोकरी लागली असून येण्या जाण्यास त्रास होतो आणि लांब पडत असल्याने आम्ही मुंबईत शिफ्ट होत असल्याचे आफताफच्या पालकांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे पंधरा दिवसांपूर्वी जेव्हा वसईतले घर रिकामे केले त्यानंतर काही वस्तू घरात राहिल्या होत्या. त्या नेण्यासाठी दोन दिवसांनी आफताफ वसईतील घरी येऊन गेला असल्याची खळबळजनक माहिती खान यांनी दिली. त्यामुळे इतका मोठा गुन्हा करून आफताफ दिल्लीहून मुंबई आणि मुंबईहून दिल्ली असा प्रवास केला होता. मात्र त्याच्या चेहऱ्यावर तीळ मात्रही पश्चाताप दिसून आला नाही असे स्थानिकांनी सांगितले.

Last Updated : Nov 15, 2022, 9:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.