मुंबई - महापलिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यामार्फत दुकाने व आस्थापना विभागाच्या नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन अधिनियम २०१७ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र हे ऑनलाइन पद्धतीने, विनाशुल्क, कार्यालयात भेट न देता देण्यात येते. या सेवेचा सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर; मात्र निर्णय लांबणीवर
असे मिळवा प्रमाणपत्र -
व्यवसाय सुलभता धोरणांतर्गत महापालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यामार्फत नोंदणी प्रमाणपत्र हे ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्याची सुविधा कार्यरत आहे. ही सेवा मुंबई महापालिकेच्या www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सेवा या ‘टॅब’ वर दुकाने व आस्थापना खाते या सदरामध्ये उपलब्ध आहे. ० ते ९ कर्मचारी कार्यरत असलेल्या आस्थापना मालकांनी प्रपत्र ‘एफ’ आणि १० व त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांच्या मालकांनी प्रपत्र ‘अ’ हे विहित कागदपत्रांसह ऑनलाइन भरावे. ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करताच नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ अर्जदाराच्या ई-मेलवर पाठवले जाते. या सुधारणांमुळे नवीन दुकाने व आस्थापनांना नोंदणी करणे सोईस्कर, पारदर्शी व त्वरित झालेले आहे. या सेवेचा अधिकाधिक व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार