ETV Bharat / state

Sanjay Raut Criticized BJP : तुमच्या पक्षश्रेष्ठींनी युती तोडली, भाजपाचं दुकान डुप्लिकेट - संजय राऊत यांचा घणाघात - शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामना

शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनामधून हल्ली नेहमीच भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला जातोय. मात्र, शुक्रवारी या मुखपत्रातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणतीही टीका केली गेली नाही. ते संस्कारी गृहस्थ असून आमचे ते जुने सहकारी आहेत. मात्र 2019 साली त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी बेईमानी केल्यामुळेच त्यांची अशी अवस्था झाली. भाजपाचं दुकान डुप्लिकेट आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपाला डिवचलंं आहे.

Sanjay Raut Criticized on BJP
संजय राऊत यांची भाजपावर टीका
author img

By

Published : Aug 19, 2023, 2:19 PM IST

मुंबई : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला कायमच लक्ष्य केलं जात आहे. शिवसेना भाजपा युती तोडण्यावरून दोन्ही पक्ष एक दुसऱ्याला दोष देत आहेत. दररोज शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या मुखपत्रातून शिंदे सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे.

भाजपाचे दुकान डुप्लिकेट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील भारतीय जनता पार्टीच्या सद्यस्थितीविषयी आपलं परखड मत व्यक्त केलंय. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांचा भारतीय जनता पक्ष कुठं आहे? ज्या पक्षाबरोबर आम्ही पंचवीस वर्षे काम केलं, तो पक्ष कुठे आहे असे गडकरींनी विचारले. ते म्हणाले की, सध्या दुकान जोरात सुरू आहे, सगळा ओरिजनल माल बाहेर आहे. यावरून संजय राऊत यांनी 'भाजपाचे दुकान डुप्लिकेट माल विकणार' असे म्हणत भाजपावर हल्लाबोल केला आहे. राज्यातील भारतीय जनता पक्ष पाहिला तर 70 टक्के हा डुप्लिकेट माल आहे, असे आम्ही म्हणत नाही तुमचे नेते बोलताहेत. ज्या विचारधारेसाठी आम्ही सगळे एकत्र आहोत, ती विचारधारा कुठे आहे, असा सवाल गडकरींनी भाजपाला केला आहे. त्यामुळे गडकरींचे अभिनंदन केले पाहिजे, असे देखील राऊत म्हणाले.

पक्षश्रेष्ठींनी युती तोडली : आमच्याशी बेईमानी केली म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी फोडली. त्यांना आमच्यासोबत घेऊन आलो, असे फडणवीस म्हणाले होते. यावर राऊत म्हणाले की, आम्ही त्यांना फक्त आरसा दाखवला. 2014, 2019 साली तुम्ही बेईमानी केली, म्हणून तुमच्यावर आज डुप्लिकेट माल घेऊन राज्य करण्याची वेळ आली. मुख्यमंत्री पदाबाबतचा जो शब्द दिला होता, तो तुम्ही तोडला. आम्ही फडणवीस यांनी बेईमानी केली असे म्हणत नाही, तर तुमच्या पक्षश्रेष्ठींनी युती तोडली म्हणून ही वेळ आली, असे राऊत म्हणाले आहेत.

भाजपावर घणाघात : एका जागेसाठी तुम्ही 2014 साली शिवसेना भाजपाची पंचवीस वर्ष असलेली युती तोडली. अमित शाहांसोबत बोलणं झालं होतं. 2019 ची निवडणूक झाली की, 50- 50 सूत्र ठरलं होतं. मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही एकनाथ शिंदे यांचं नाव सुचवलं होतं. हे नाव चालणार नाही, असं म्हणत त्यांनी युती तोडली, असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपावर केला.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut on Sharad Pawar Photo : गुरुदैवताच्या पाठीत खंजीर खुपसता आणि त्यांचाच फोटो लावता; संजय राऊतांनी फटकारले
  2. Shiv Sena Hosting INDIA Meeting : 'इंडिया'च्या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला; ५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची असणार उपस्थिती
  3. Sanjay Raut On Manipur Violence: केंद्र सरकार असंवेदनशील, विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळासोबत खासदार अरविंद सावंत मणिपूरला जाणार- संजय राऊत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.