ETV Bharat / state

'मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत'

author img

By

Published : Aug 31, 2020, 12:16 PM IST

राज्य सरकारकडून सावध पावले टाकली जात असताना भाजपनं मंदिरं खुली करण्याची मागणी करत राज्यभर घंटानाद आंदोलन केलं. त्या भूमिकेवरून शिवसेनेने निशाणा साधत भाजपला लक्ष्य केले आहे. लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय?, असा सवाल सेनेने सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर टीका
सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर टीका

मुंबई - धार्मिक स्थळे उघडावी यासाठी विरोधी पक्षाने घंटानाद आंदोलन केले होते. मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत, आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे बघू अशा शब्दांत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे.

लोकांना मन:शांती व पोटशांती हे दोन्ही मंदिराच्या माध्यमातून मिळाला हवी. पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार का, असा सवाल सामनातून विरोधी पक्षाला विचारण्यात आला आहे. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर फिजिकल डिस्टंन्सिंग राबवायचे हे लोकांना कळते, असे देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले. पण भाजपतर्फे घंटानाद आंदोलन झाले त्याचे छायाचित्र पाहिल्यावर समजले की, सोशल डिस्टंन्सिंगची कशी जोरदार काशी झाली आहे. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या प्रश्नही विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे. ज्या मनःशांतीचा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात. त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे, असा सल्ला देखील सामनातून देण्यात आला आहे.

सत्तेपुढे शहाणपण शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची प्रथा आहे. पण सध्याच्या काळात विरोधी पक्षापुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असे म्हणणे अधिक व्यावहारिक ठरेल. विरोधीपक्ष नावाचा प्राणी कोणता प्रश्न उधळेल ते सांगता येत नाही. महाराष्ट्रातील प्रबळ विरोधी पक्षाने सर्वत्र घंटानाद केला, कुठे थाळीनाद केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा, या मागणीसाठी हा घंटानाद होता. विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपच्या पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई मंदिर उघडण्याचे आंदोलन सुरू केले आहे. तिकडे संभाजीनगरचे मंदिर उघडण्याचे आंदोलन सुरू केले आहे. संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार जलील मियांनी 2 सप्टेंबर नंतर मशिदीची टाळी उघडण्याची घोषणा केली आहे. जलील यांनी मशिदी उघडण्याची बांग दिली म्हणून भाजप पुढाऱ्यांनी राज्याच्या आरोग्याचा विचार न करता घंटा वाजवणे हे बरे नाही. मुळात सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे का बंद करावी लागली, देवांना बंदिवान का व्हावे लागले, याचा सारासार विचार करून याप्रश्नी ठिकाणी मतप्रदर्शन करणे गरजेचे आहे.

जेथे-जेथे शाळा आणि प्रार्थनास्थळे उघडली तेथे कोरोनाचे संक्रमण वाढले हे सत्य आहे. तिरुपती बालाजी मंदिरात याचा फटका बसला आहे. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानंतर मुख्यमंहतांसह अनेकांना लागण झाली. देशाचे गृहमंत्री अमित शहा कोरोनाच्या विळख्यात सापडले व त्यांच्यावर पांढऱ्या कपड्यातील देवदूत म्हणजे डॉक्टर उपचाराची शर्थ करीत आहेत. रुग्णालय, कोविड सेंटर्स, आरोग्य यंत्रणा सध्या देवाचे काम करीत आहेत. गर्दीत व त्यातून वाढणारा संसर्ग टाळण्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद आहेत. पण हॉस्पिटलमध्ये गर्दी आहे. मंदिर हे प्रार्थनेचे स्थळ आहे. तेथे मानसिक आधार मनःशांती मिळते, म्हणून मंदिरांची कुलुपे उघडा अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. पण मंदिरे तसेच सर्व इतर सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे ही अर्थकारणाची उपजीविकेची साधने आहेत. लाखो कुटुंबाच्या पोटापाण्याची रचना ही देवादिकांनीच केली आहे. सिद्धिविनायक, तुळजापूर , महालक्ष्मी, शिर्डी, माहूर, भद्रा, मारुती, अष्टविनायक, शनिशिंगणापूर, शेवगावचे गजानन महाराज ही महत्वाची मंदिरे म्हणजे धर्म व पर्यटनाचा पवित्र संगम आहे.

मंदिराबाहेर अनेक पूजा सामान, खण नारळ, प्रसादाची दुकाने लाखो कुटुंबांची चूल पेटवत आहेत. वारकरी संप्रदायाचे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार देशभरात फिरून आध्यात्मिक संवाद साधतात. त्यांच्यासोबत मृदंग तबला पेटीवाले त्याच आधाराने उपजीविकेचे साधन म्हणून अध्यात्माचे धूत म्हणून काम करतात व त्यात काही चुकीचे नाही. त्यामुळे फक्त मनःशांतीच नव्हे तर लाखो कुटुंबांचे अर्थकारण चालावे म्हणून मंदिरे उघडावेत याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. कोरोनामुळे अमरनाथ, वैष्णो देवीची यात्रा झाली नाही, त्याचा आर्थिक फटका काश्मीर खोर्‍यातील असलेल्या कुटुंबांना बसला आहे. दुसरे असे की मंदिरातील सर्व देव जरी गाभाऱ्यात बंदिवान असला तरी यापैकी सर्व धार्मिक संस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरिबांसाठी अन्नछत्रे वगैरे राबवून लाखो लोकांचा दुवा घेतला आहे. म्हणजे मंदिराचे सेवाकार्य थांबलेले नाहीत.

लालबागचा राजाने मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही, पण आरोग्य महायज्ञ करून नवीन परंपरा सुरू केली. अनेक लोकांना मनःशांती व पोट शांती हे दोन्ही मंदिराच्या माध्यमातून मिळायला हवी. मनःशांतीचा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात, त्या मनशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मनःशांतीचा मार्ग त्यागातून जात असतो. मनःशांती हि महात्मा गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासाठी असते. गौतम बुद्धाने मनःशांतीसाठी राज्याचा त्याग केला, कठोर साधना देखील केली. असा त्याग सध्याचे राजकारणी करणार आहेत का? दोन वेळची चूल पेटवणे ही लाखोंसाठी मनःशांती असते. तर, अनेकांना राजकीय खुर्चीप्राप्ती हाच मनःशांतीचा मार्ग वाटतो, अशा शब्दांत विरोधी पक्षेनेत्यांची सत्तेसाठी असलेल्या महत्वकांक्षेवर टीका करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.