ETV Bharat / state

Sanjay Raut on MIM Proposal : एमआयएमचा युतीचा प्रस्ताव म्हणजे मोठं कटकारस्थान - संजय राऊत - एमआयएम प्रस्ताव संजय राऊत प्रतिक्रिया लेटेस्ट बातमी

औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांशी कधीही युती होऊ शकत नाही. या राज्यात कोणीही एमआयएमसोबत ( AIMIM ) जाणार नाही. शिवसेनेला एमआयएमने आघाडीचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव म्हणजे भारतीय जनता पक्षाचं मोठं कटकारस्थान असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) यांनी केला आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एमआयएमचा वापर करत असून ( Sanjay Raut criticize BJP and MIM ) त्या उद्दिष्टाने अशा प्रकारच्या ऑफर समोर आणल्या जात आहेत.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Mar 20, 2022, 2:55 PM IST

Updated : Mar 20, 2022, 3:03 PM IST

मुंबई - औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांशी कधीही युती होऊ शकत नाही. या राज्यात कोणीही एमआयएमसोबत ( AIMIM ) जाणार नाही. शिवसेनेला एमआयएमने आघाडीचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव म्हणजे भारतीय जनता पक्षाचं मोठं कटकारस्थान असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) यांनी केला आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एमआयएमचा वापर करत असून ( Sanjay Raut criticize BJP and MIM ) त्या उद्दिष्टाने अशा प्रकारच्या ऑफर समोर आणल्या जात आहेत. मात्र, एमआयएमसोबत शिवसेना कधीही युती करणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

  • Uddhav Thackeray in his meeting with party MPs and district presidents today said that Shiv Sena will not ally with AIMIM. He added that AIMIM is BJP's 'B team': Sanjay Raut, Shiv Sena pic.twitter.com/Bofpo98HAp

    — ANI (@ANI) March 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या प्रस्तावाचा आधार घेऊन शिवसेनेला भारतीय जनता पक्ष 'जनाब सेना' म्हणत आहे. त्या भाजपाने आपला इतिहास तपासून पहावा. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी संबंध असलेल्या मेहबूबा मुक्तीसोबत मिळवणी करून भाजपने सरकार स्थापन केलं होतं, हे भाजप विसरला का? असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दादर मधी सेना भवन येथे बैठक 'शिवसंपर्क अभियाना'बाबत ची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. ही बैठक पार पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजप आणि एमआयएमवर टीका केली.

माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत

शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न -

भारतीय जनता पक्षाकडून एमआयएमला आघाडीची ऑफर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतरच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रस्ताव बोलून दाखवला. मात्र, हे सर्व केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठी सुरू आहे. शिवसेनेबाबत जनतेमध्ये गैरसमज पसरावे, यासाठी हा सर्व खटाटोप केला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तडजोड करणार नाही. तसेच शिवसेनेचे हिंदुत्व हे अंगार आहे आणि भाजप सांगत असलेलं हिंदुत्व म्हणजे भंगार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले असल्याचेही राऊत यांनी म्हणाले.

हेही वाचा - येत्या काही दिवसात महाराष्ट्राचा दौरा करणार, भाजपाचे हिंदुत्व केवळ राजकारणासाठी - मुख्यमंत्री ठाकरे

12 आमदारांची नियुक्‍ती अद्याप नाही, हा लोकशाहीचा खून -

राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष सोईस्कर पणे बोलणे टाळते. त्या आमदारांना अद्यापही नियुक्त न झाल्याने हा महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेवर अन्याय आहे. हा लोकशाहीचा खून असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले.

Last Updated : Mar 20, 2022, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.