मुंबई- राज्यात अजूनही सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना ५०-५० समान सत्ता वाटप व मुख्यमंत्री पदावर अडून असल्याने भाजपला आपली सत्ता स्थापन करता आली नाही. या दरम्यान आमदारांची फोडाफोडी होऊ नये यासाठी शिवसेनेने आपल्या आमदारांना शहरातली 'द रिट्रीट' या हॉटेलात ठेवले होते. आज याच हॉटेलात वास्तव्यास असणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांनी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा देण्यासाठी स्वाक्षरी केल्या आहेत.
मालाड मार्वे रोड येथील 'रिट्रीट' या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठींबा देण्यासाठी स्वाक्षरी केल्या आहेत. आज राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले आहे. त्यामुळे पुरेसे संख्याबळ मिळवण्यासाठी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार आहे.
हेही वाचा- बिकेसी चुनाभट्टीतील कनेक्टर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला