मुंबई Shivsena MLA Disqualification Hearing : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमोर या आठवड्यातील सलग चौथ्या दिवसाची सुनावणी पार पडली. पहिल्या सत्रात ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी आणि साक्ष नोंदवण्यात आली. तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी प्रभूंना उलट प्रश्न विचारले. तसेच जो मेल शिंदे गटाला पाठवण्यात आला होता, त्याबाबत प्रभूंची साक्ष घेण्यात आली. तर शनिवारी सुनावणीच्या दुसऱ्या सत्रात शिवसेना विधिमंडळाचे सचिव विजय जोशी यांची उलट साक्ष घेण्यात आली. सलग चौथ्या दिवशी सुनावणी पार पडली. आता पुढील सुनावणी ७ आणि ८ डिसेंबरला नागपूर येथे होणार आहे.
ठाकरे गटानं मेल रेकॉर्डवर आणला : मागील सुनावणीपासून शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे प्रभूंची उलट तपासणी करताना, अनेक उलटसुलट प्रश्न विचारत होते. तर या आठवड्यातील कालपर्यंत तुम्ही जो शिंदे गटाला मेल पाठवला होता, तो कधी, कसा व कोण्याच्या सांगण्यावरुन पाठवला होता, असे प्रश्न विचारण्यात आले होते. तोच मेल ठाकरे गटाने रेकॉर्डवर आणला असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. या मेलवरुन प्रभूंना काही प्रश्न विचारण्यात आले. या मेलबाबत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचे समाधान झाल्यानंतर, त्यांनी दुपारच्या सत्रानंतर विधिमंडळाचे सचिव विजय जोशी यांची उलट साक्ष घेतली.
व्हीपबाबत जोशींची उलट साक्ष : दुपारच्या सत्रात विधिमंडळाचे सचिव विजय जोशी यांची उलट साक्ष घेण्यात आली. यावेळी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी अनेक प्रश्न विचारले. व्हीप तुम्ही टाइप केला की, तुम्हाला कोणी सांगितले? यावर कोणी सही केली? याचे वाटप कसे केले? तसेच तुम्ही व्हीप टाईप केला तेव्हा तुमचे ऑपरेटर कुठे होते? असे अनेक प्रश्न शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी विचारले. यावर जोशी यांच्या उत्तरांनी जेठमलानी समाधानी झाले नाहीत. दुसरीकडे शनिवारी सायंकाळपर्यंत जोशींची उलट साक्ष घेण्यात आली. यानंतर शनिवारी सुनावणी संपली. आता पुढील सुनावणी नागपूर येथे होणार असून, पुढील सुनावणी ७ आणि ८ डिसेंबरला होणार आहे.
हेही वाचा -
- तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर बनून खुर्चीवर बसलेत, संजय राऊतांचा नार्वेकरांवर घणाघात
- शरद पवारांची पुण्यात तुफान फटकेबाजी, अजित पवारांना सडेतोड उत्तर; पाहा संपूर्ण पत्रकार परिषद
- मोदींनी सिंचन घोटाळ्याचे आरोप कुणावर केले, शरद पवारांचा सवाल, अजित दादा प्रफुल पटेलांच्या दाव्यांचा घेतला समाचार