ETV Bharat / state

आमदार अपात्रतेच्या निकालानंतर थेट होणार जागावाटपात परिणाम, कोणाचे पारडे होणार जड? - Vidhan Sabha Speaker

Result of disqualification of MLA : महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा अभूतपूर्व निकाल आज जाहीर होणार आहे. एकनाथ शिंदे गटाची बाजू मजबूत की, उद्धव ठाकरे गटाची बाजू सरस याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या घडामोडीचा थेट परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरही होणार आहे.

Result of disqualification of MLA
राज्यातील सत्तानाट्याच्या निकालाची उत्कंठा शिगेला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 11:35 AM IST

मुंबई - Result of disqualification of MLA आमदार अपात्रतेची लढाई ही मागील दोन वर्षापासून आरोप प्रत्यारोप, न्यायालयीन लढा आणि विधिमंडळाच्या स्तरावर लढली गेली असून अखेर हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणी निकालाची जबाबदारी ही विधानसभा अध्यक्षांकडे सोपविली गेली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एकंदरीत वागणुकीवर अनेकदा उद्धव ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित केले गेले. अखेर आज या प्रकरणाचा अंतिम निकाल येणार आहे. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे सहकारी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. तसेच निकालानंतर या दोन्ही गटाकडे काय पर्याय असतील. त्यासोबत या निकालाचा येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटपावर किती प्रभाव पडू शकतो, हे पाहणे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.

दोन्ही गटाचे पारडे जड - यापूर्वी निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच मूळ शिवसेना असल्याचा निवाडा देत त्यांना पक्ष व चिन्ह बहाल केले होते. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पारडे जड मानले जाते. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता संघर्षात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहिला असता उद्धव ठाकरे गटाचे पारडे जड वाटते. अशा परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निवडणूक आयोगाच्या निकालाला महत्त्व देतात की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला महत्त्व देतात यावर आजचा निकाल अवलंबून असणार आहे. निकाल देण्याच्या दोन दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा निकाल एकतर्फी तर जाणार नाही ना? अशी शंका उद्धव ठाकरे यांच्या गटात निर्माण निर्माण झाली. तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटातील नेत्यांनीही दिल्या आहेत.

शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास... राज्यातील या सत्ता नाट्याच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र ठरल्यास मुख्यमंत्र्यांना तात्काळ राजीनामा द्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर तांत्रिकदृष्ट्या सरकार कोसळेल. परंतु सरकारमधील अजित पवार गटाच्या समावेशामुळे महायुतीकडे बहुमतापेक्षा अधिक आमदार असल्याने सरकार स्थिर राहील. परंतु मुख्यमंत्रीपद हे दुसऱ्याकडे जाऊ शकतं. कारण अपात्र झालेले शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्र्यांची शपथ घेऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणलं जाऊ शकतं, अशी शक्यता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यापूर्वीच बोलून दाखवली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास.. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय लागल्यास त्यांचे सरकार टिकेल. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले जाऊन त्यांची आमदारकी धोक्यात येईल. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. परंतु हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेल्यास शिंदे गटाचे पारडे मजबूत होणार आहे.

दोघांपैकी कोणीच अपात्र ठरणार नाही?- शिवसेनेच्या दोन्ही गटांपैकी कुठलाही गट अपात्र ठरू शकत नाही, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक शिवसेनेने २०१८ साली घटनेमध्ये बदल केला होता. परंतु त्याचा तपशील न मिळाल्याचे सांगत निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह लोकप्रतिनिधी बहुमताच्या जोरावर शिंदेंकडे सोपवले होते. याच कारणाने कुणालाही अपात्र ठरवता येत नसल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सांगू शकतात. परंतु ही शक्यता फारच कमी वाटत आहे.

जागा वाटपाबाबत वर्चस्वाची लढाई- राज्यात लोकसभा त्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना राज्यातील सत्ता संघर्षाचा महत्त्वाचा बहुप्रतिक्षित निकाल आज येत आहे. या निकालाचा थेट परिणाम जागा वाटपांवरसुद्धा होणार आहे. शिंदे गटाचे आमदार पात्र ठरल्यास राज्यात शिंदे गटाचे पारडे मजबूत होईल. याच कारणानं खरी शिवसेना ही शिंदे गट यांचीच असून जागा वाटपाबाबत त्या पद्धतीची मागणी शिंदे गटाकडून केली जाणार आहे. यात काही दुमत नाही.

जागा वाटपाबाबत वर्चस्वाची लढाई- मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने २३ जागा लढवून १९ जागी विजय संपादन केला होता. त्या अनुषंगाने शिंदे गट महायुतीत जागा वाटपात २३ जागांवर आग्रही असणार आहे. हीच मात्रा उद्धव ठाकरे गटालाही लागू होणार आहे. आजचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आल्यास महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना प्रमुख घटक असणार आहे. जागा वाटपात उद्धव ठाकरे यांच्याकडूनही २३ जागांची मागणी केली जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी सुद्धा स्वतंत्र जागांची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाऊ शकते. अर्थात या निकालानं उद्धव ठाकरे गटाकडून जवळपास मागील दोन वर्षापासून लढत असलेल्या संघर्षाला न्याय मिळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीत जनाधारसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत आजच्या निकालानंतर जागा वाटपाबाबत वर्चस्वाची लढाई सुद्धा सुरू होणार आहे.

हेही वाचा -

  1. महाविकास आघाडीत लवकरच 'वंचित'चा समावेश होण्याची चिन्हं, संजय राऊत यांनी दिले स्पष्ट संकेत
  2. काही तासांत येणार शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल; निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
  3. आमदार अपात्र प्रकरणी हालचालींना वेग; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि DGP यांच्यात झाली बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.