ETV Bharat / state

आमदार अपात्र प्रकरणी मराठीवरुन घोळ; दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये खडाजंगी - Anil Parab

MLA Disqualification Case : शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्र प्रकरणी (MLA Disqualification) सुनावणीला सुरुवात झालीय. ठाकरे-शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तीवादा दरम्यान खडाजंगी पाहायला मिळाली. ठाकरे गटाच्या वतीनं व्हीप प्रकरणातील सर्व कागदपत्रे सादर करण्यात आले. शिंदे गटाला कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली. तर आता पुढील सुनावणी बुधवारी साडेअकरा वाजता होणार आहे.

Anil Parab Reaction
आमदार अपात्रता प्रकरणी मराठी वरून घोळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 7:33 PM IST

प्रतिक्रिया देताना अनिल परब

मुंबई MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या समोर झाली. उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची पहिली साक्ष पार पडली. बुधवारीही त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. मंगळवारच्या सुनावणीत दोन्ही बाजूच्या गटाच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यामुळं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील याप्रसंगी नाराजी व्यक्त केली. तसेच दोन्ही गटाच्या वकिलांनी परस्पर वैयक्तिक टिप्पणी करु नये, असंही नार्वेकरांनी ठणकावलं.

ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर : मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या वेळी पक्षाने पाठवलेल्या अधिकृत नोटीस तत्कालीन सर्व वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार मानण्यासाठी पाठवलेल्या सर्व पोस्ट, सर्व पुरावे ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले आहेत. तर शिंदे गटाला कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत विधानसभा अध्यक्षांनी दिली. याप्रसंगी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची साक्ष रेकॉर्डवर घेण्यात आल्यानंतर, सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर त्यांची उलट तपासणी घेण्यात आली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं वकील देवदत्त कामत आणि वकील अनिल साखरे यांनी युक्तिवाद केला.

मी सुशिक्षित आहे, मला इंग्रजी समजतं : सुनील प्रभू यांची उलट तपासणी होत असताना, शिंदे गटाच्या वकिलांकडून सुनील प्रभूंनी मराठीमध्ये प्रश्न विचारण्याची मागणी केली. त्यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना तुम्ही आमदार अपात्रेबाबत याचिका या इंग्लिशमध्ये दाखल केल्या आहेत, हे सत्य आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर सुनील प्रभू यांनी सांगितलं की, हो मी इंग्लिशमध्ये याचिका दाखल केली आहे. वकिलांना हिंदी आणि मराठीमध्ये मी सांगितलं होतं, त्यानंतर त्यांनी ती इंग्रजीमध्ये मांडली आणि मी समजून घेतल्यानंतर त्यावर सही केली असं म्हटलं. त्यावर प्रती प्रश्न करताना जेठमलानी यांनी सांगितलं आहे की, तुम्ही अपात्रता याचिकेमध्ये असं कुठेही सांगितलं नाही की, याचिकेत जे लिहिलं आहे ते तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगितलं आहे. त्यावर सुनील प्रभू म्हणाले की, मी सुशिक्षित आहे. मी जे काही बोललो ते सर्व रेकॉर्डवर आहे. मी आमदार असून २ ते ३ लाख लोकांनी मला निवडून दिलं आहे. मला माझ्या भाषेत समजावून सांगितल्यानंतर मी सही केली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला आक्षेप : या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब (Anil Parab Reaction) म्हणाले की, सुनावणीत सुनील प्रभू यांची उलट तपासणी झाली. सुनील प्रभू यांनी विनंती केली की, त्यांना मराठीत विचारणा करावी. पण नंतर आमच्या लक्षात आलं की, सुनील प्रभू जे काही बोलत आहेत ते मराठीत ट्रान्सलेट होत असताना जसेच्या तसे ट्रान्सलेट होत नाही. त्यावर आम्ही ही बाब निर्दशनास आणून दिली. हा सर्व वेळकाढूपणा चालू आहे. पण त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावाच लागणार आहे. कदाचित अजून त्यांच्याकडून इतरांना सुनावणीसाठी बोलावलं जाऊ शकतं. सुनावणी दरम्यान सुनील प्रभू यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी जे संविधान लिहिलं आहे, त्या संविधानावर माझा विश्वास आहे, त्या पद्धतीने मी उत्तरे देत आहे. परंतु त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख घेण्याचे टाळलं, त्यावर आमच्या वकिलांनी आक्षेप घेतला. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, त्यांचा उल्लेख करणं हे जर चुकीचं असेल तर काय सांगावं.

पुढील तीन दिवस सतत सुनावणी : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ डिसेंबरपर्यंत या प्रकरणाचा निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून त्यांना व्हीप मिळाला नसल्याचा दावा यापूर्वी केला होता. त्यावर ठाकरे गटाने पुरावे सादर करण्याची परवानगी मागितली होती. यावर आज ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला 24 नोवेंबर पर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता पुढील सुनावणी उद्या सकाळी साडेअकरा वाजता होणार असून सतत तीन दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे.

हेही वाचा -

  1. MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला शरद पवार गटाच्या आमदारांचं लेखी उत्तर
  2. Sanjay Raut on Rahul Narvekar: आमदार अपात्रता प्रकरण रखडल्यानं संजय राऊत संतप्त.. म्हणाले राहुल नार्वेकर हे चोरांचे...
  3. Rahul Narvekar on MLAs disqualification : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कोणता निर्णय घेणार? राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट सांगितलं...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.