मुंबई - शहरात गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. सायन, हिंदमाता, कुर्ला, किंग सर्कल या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे पावसात पाणी तुंबले आहे. या नालेसफाई वरून विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. एकीकडे विरोधक टीका करत असताना दुसरीकडे चांदीवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे भलतेच आक्रमक दिसले. त्यांनी आपला राग थेट कंत्राटदारावर काढला. आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाई झाली नाही म्हणून कंत्राटदाराला चक्क नाल्यात बसवले.
नाल्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ, शिवसेना आमदाराने नाल्याच्या घाणीत बसवले - mumbai rain latest news
कंत्राटदाराला नाल्यात बसून आमदार लांडे यांचे समाधान झाले नाही. यापेक्षाही पुढचं पाऊल म्हणजे नाल्यातील कचरा त्यांनी थेट कंत्राटदाराच्या अंगावरच टाकला.