ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले - भास्कर जाधव

आता त्यांच्या पत्नीच्या विनंतीवरून ठाकरे सरकार याप्रकरणाची चौकशी करत आहे. सचिन वाझे तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला.

bhaskar jadhav
भास्कर जाधव
author img

By

Published : Mar 9, 2021, 8:05 PM IST

मुंबई - मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधकांनी पोलीस अधिकारी सचिन वझेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. यावर बोलताना शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांवरच प्रहार केला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी असताना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबले, असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षदा नाईक यांच्या मागणीवरुन ठाकरे सरकार या प्रकरणाची चौकशी करत आहे, असेही ते म्हणाले.

विधानसभेतील आरोप-प्रत्यारोप.

आता त्यांच्या पत्नीच्या विनंतीवरून ठाकरे सरकार याप्रकरणाची चौकशी करत आहे. सचिन वाझे तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वाझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांना निलंबित करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली. त्यानंतर विरोधी आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन सभागृह दणाणून सोडले. तेव्हा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी अन्वय नाईक प्रकरणाचा दाखला देत भाजपवर जोरदार टीका केली.

फणडवीसांचे प्रत्युत्तर -

दरम्यान, भास्कर जाधव यांनी सभागृहात हा आरोप केल्यानंतर अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. ही गोष्ट भास्कर जाधव यांना माहिती नसेल. तुम्ही मला धमक्या देऊ नका. मी धमक्यांना घाबरत नाही, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

हेही वाचा - माझ्या पतीचा खून सचिन वझेंनी केला; विमला हिरेन यांचा एफआईआरमध्ये जवाब

अन्वय नाईक हत्या प्रकरण आत्महत्या प्रकरण काय?

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. यासोबतच तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. ते कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षदा यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

अन्वय नाईक यांच्या कंपनीने अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ बनविला होता. याच कामाचे गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांनी केला. यानंतर रायगडमधील अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने, नंतर 5 मे 2020 रोजी म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्येला दोन वर्षं झाल्यानंतर अक्षता नाईक यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आणि न्यायाची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडीला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर अर्णब गोस्वामी यांनी याबाबतचे आरोप फेटाळले आहेत.

हेही वाचा - मनसुख हिरेन, खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेत गोंधळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.