मुंबई - पुण्यातील मावळ आणि विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघाची आज मातोश्रीवर आढावा बैठक घेण्यात आली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी होती मोदींची लाट आणि आता आहे उद्धव ठाकरेंची लाट. मावळ लोकसभा शिवसेनाच जिंकणार असा, विश्वास मावळचे जिल्हाप्रमुख बबनराव पाटील यांनी व्यक्त केला.
पार्थ पवाराच्या उमदेवारीवर ते म्हणाले, कोणीही उमेदवार असू द्या, मावळमध्ये शिवसेनाच जिंकणार. कर्जत नगरपालिकेत राष्ट्रवादीचा आमदार असतानाही आम्ही नगरपालिका ताब्यात घेतली. तसेच आज वर्ध्याच्या उमेदवारांचीदेखील मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत चाचपणी घेण्यात आली. अमरावतीचे माजी खासदार व वर्धा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अनंत गुडे हे या बैठकीला उपस्थित होते. वर्धा स्वबळावर लढायची आहे, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी या बैठकीत दिले.