ETV Bharat / state

अजान स्पर्धेशी माझा काहीही संबंध नाही, मी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही - पांडुरंग सपकाळ - shivsena leader pandurang sapkal

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे. बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सपकाळ यांनी अजान स्पर्धेची माहिती दिली. याबद्दलचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अजानमध्ये फार गोडवा असतो. ती ऐकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल, असे मनाला वाटतं राहते, अशा शब्दांत सपकाळ यांनी अजानचे कौतुक केले आहे.

shivsena leader pandurang sapkal
पांडुरंग सकपाळ
author img

By

Published : Nov 30, 2020, 7:13 PM IST

Updated : Nov 30, 2020, 7:36 PM IST

मुंबई - राज्यात भाजपाशी युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तेव्हापासून भाजपाकडून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावरून भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे. याबाबत पांडुरंग सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता मी स्पर्धा आयोजित केलेली नाही. माझ्याकडे मुस्लिम शिष्टमंडळ आले होते. त्यांना तुम्ही अशी स्पर्धा आयोजित करा, अशी शिफारस केल्याचे पांडुरंग सपकाळ यांनी सांगितले आहे.

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ याबाबत प्रतिक्रिया देताना.

काय म्हणाले पांडुरंग सपकाळ -

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे. बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सपकाळ यांनी अजान स्पर्धेची माहिती दिली. याबद्दलचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अजानमध्ये फार गोडवा असतो. ती ऐकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल, असे मनाला वाटतं राहते, अशा शब्दांत सपकाळ यांनी अजानचे कौतुक केले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही अजान स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज, उच्चार हे निकष असतील. ते किती मिनिटांत अजान संपवतात, कशी प्रकारे म्हणतात, याकडे मौलाना लक्ष देतील. ते परीक्षक म्हणून काम पाहतील. अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसे दिली जातील. या संपूर्ण स्पर्धेचा खर्च शिवसेना करेल, असे सपकाळ यांनी सांगितले. काहींना अजानच्या आवाजामुळे त्रास होतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न सपकाळ यांना विचारण्यात आला. त्यावर सगळेच धर्मग्रंथ मानवता आणि शांततेची शिकवण देतात. अजानचा कालावधी फार कमी वेळ असतो. त्यामुळे अजानच्या आवाजाबद्दल अडचण वाटण्याचे काहीच कारण नाही. याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे सपकाळ म्हणाले आहेत. आम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून समाजासाठी काम करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सर्वांना सोबत घेऊन काम करत आहेत, असेही त्यांनी पुढे सांगितले.

हेही वाचा - 'मराठा समाज ओबीसींच्या 17 टक्क्यांत आला तर त्यांना काहीच मिळणार नाही'

भाजपाची टीका -

मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचे काम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केले नाही. काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे आज हेच करत आहेत. औवेसीला लाज वाटेल, असे हे लांगुलचालन आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तर त्यांनी केव्हाच सोडले होतं. आता साधे हिंदुत्वही शिवसेनेला मान्य नाही, अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली. लहान मुलांसाठी अजान स्पर्धेनंतर रस्त्यावर सामूहिक नमाज स्पर्धेचे आयोजनही करा. यापुढे दसरा मेळाव्यानंतर नारा-ए-तकबीर, अल्ला-हू-अकबरच्या घोषणा ऐकू येणार बहुतेक, असेही त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

Last Updated : Nov 30, 2020, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.