मुंबई - 'मुंबई मा जलेबी ने फाफड़ा, उद्धध ठाकरे आपडा' या टॅगलाईनसोबत आता शिवसेनेने गुजराती मतदारांना वळवायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात रविवारी शिवसेनेचा गुजराती समाज मेळावा झाला. यात गुजराती समाजाचे अनेक प्रमुख लोक उपस्थित होते. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या पुढाकाराने गुजराती समाजाचा मेळावा झाला.
निवडणुकीत फायदा
मुंबई महापालिका निवडणुक तोंडावर आलेल्या आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. बीएमसीमध्ये सत्ता असणाऱ्या शिवसेनेला माहिती आहे की, 227 जागांपैकी 50-52 जागा गुजराती मतदारांच्या आहे. गुजराती मतदारांचा कल भाजपाकडे आहे. मात्र यापैकी काही मते जरी शिवसेनेकडे वळली तर निवडणुकीत फायदा होणार आहे. यासाठीच शिवसेनेने आतापासूनच गुजराती मतदारांना वळवायला सुरुवात केली आहे, असे बोलले जात आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत वकिलांची बैठक