मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या दसरा मेळाव्यात सहभागी होणार आहेत. भाजपसोबत युती जरी केली असली तरी युती संदर्भात सूचक विधान करण्याची संधी उद्धव ठाकरेंनी सोडलेली नाही. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा - एमआयएमचा बाप मीच; खैरेंचे जलील यांना प्रतिउत्तर
मंगळवारी नवरात्रीचा दहावा दिवस म्हणजे दसरा आहे. यानिमित्त शिवाजी पार्क मैदानात गेल्या ५३ वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मेळाव्यात शिवसेनेचे प्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात. लोकसभा निवडणूक दोन आठवड्यावर असताना 'विधानसभेवर भगवा फडकणारच, हीच ती वेळ दसरा मेळावा' अशा शीर्षकाखाली शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. हजारो शिवसैनिक या दसरा मेळाव्यात येतात.
हेही वाचा - ...मग महाराष्ट्राच्या करदात्यांचा पैसा नेमका कुठे खर्च केला जातो? - कॉ. विश्वास उटगी
शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यानिमित्ताने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना हा मेळावा पाहता यावा यासाठी डिस्प्ले एलईडी मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची व्यवस्था शिवाजी पार्क येथे करण्यात आलेली आहे. या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक पक्षप्रमुख काय बोलतात हे ऐकण्यासाठी येतात आणि पहिल्यांदाच आदित्य ठाकरे देखील या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे हे या दसरा मेळाव्यात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी चिपळूणमध्ये उमेदवार