ETV Bharat / state

साडेचार वर्षात काश्मिरातील गुलाबाचे ताटवे का कोमजले ? सेनेचा भाजपवर निशाणा

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या साडेचार वर्षात काश्मिरातील गुलाबाचे ताटवे का कोमजले ?

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी
author img

By

Published : Feb 18, 2019, 1:11 PM IST

मुंबई - 'काश्मीरमधील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल, तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा', असा प्रचार सुरू करणे म्हणजे ४० मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे. असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या साडेचार वर्षात काश्मिरातील गुलाबाचे ताटवे का कोमजले ? आशेच्या गुलाबपाकळ्या का झडून पडल्या असेही सेनेने म्हटले आहे.

काश्मिरातील पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आले. अलीकडे आमचा तिरंगा फडकवण्यात कमी व मृत जवानांच्या शवपेट्यांना गुंडाळण्यातच ज्यादा खर्च होत आहे. कोणतेही युद्ध नाही, पण एकाच वेळी ४० जवान गतप्राण होतात. हे गेल्या साडेचार वर्षात पहिल्यांदा झालेले नाही. उणीदुणी काढण्याची ही वेळ नाही. सरकार व जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची, त्यांचे आत्मबल वाढविण्याची ही वेळ आहे. पण ‘सरकार’ विसरले असले तरी देशाची जनता काही गोष्टी विसरत नसल्याचे म्हणत सेनेने भाजपला लक्ष केले आहे.

काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या मुद्यावरुन त्यांच्यावर टीका करत होते. ‘छप्पन्न इंचांची छाती’ हा शब्द कश्मीरसंदर्भातच आला. आमचे सैनिक कमजोर नसून दिल्लीत बसलेले सरकार लाचार आणि कमजोर असल्याचा घणाघात तेव्हा मोदी करत होते. पाकिस्तानात घुसून मारले पाहिजे, असा तेव्हा त्यांचा बाणा होता. या सगळ्याची लोक पंतप्रधान मोदींना आठवण करून देत असल्याचे सेनेने म्हटले आहे.

undefined

या दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी सरकरान नेमकी कोणती कारवाई करणार याची सगळेजण वाट बघत आहेत. याचा बदला म्हणून तुम्ही पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राइक करणार असाल तर त्यास बदला म्हणता येणार नाही. मुळात पाकव्याप्त कश्मीर हा हिंदुस्थानचा भाग आहे. त्यातील चौक्यांवर हल्ले करणे म्हणजे पाकड्यांना धडा शिकवणे नव्हे. पाकिस्तानला धडा शिकवला तो इंदिरा गांधींनी. लाहोरपर्यंत फौजा घुसवून पाकचा तुकडाच पाडला. लाखावर सैन्याला गुडघे टेकायला लावल्याचे सेनेने म्हटले आहे.

काश्मीरच्या निमित्ताने देशात ‘हिंदू-मुसलमान’, ‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ असा वाद निर्माण करून धार्मिक फाळणीच्या नावावर राजकीय लाभ म्हणजे निवडणुकांचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ती खरी ठरू नये. काश्मीरातील तरुण शिक्षण, रोजगार, प्रतिष्ठा यापासून ‘दूर’ जात आहे व तोच तरुण नाइलाजाने उपजीविका म्हणून स्वतःच्याच देशाविरुद्ध शस्त्र हाती घेत आहे. यावर काम करणे गरजेचे असल्याचे म्हणत सेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

Intro:‘कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा’’ असा प्रचार सुरू करणे म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे.शिवसेनेची भाजपवर अग्रलेखातून टीका

मुंबई

कश्मीर प्रश्नाचे राजकारण देशात करायचे, पण कश्मीरात उद्ध्वस्त झालेल्या गुलाबावर पाय ठेवून पुढे जायचे हे आता तरी थांबावे.असे शिवसेने अग्रलेख लिहत मोदींवर व भाजपवर टीका केली आहे ‘‘कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा’’ असा प्रचार सुरू करणे म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे. साडेचार वर्षांत कश्मीरातील गुलाबाचे ताटवे का कोमेजले, आशेच्या गुलाबपाकळ्या का झडून पडल्या याचे उत्तर द्या!असा प्रखर प्रश्न विचारत अग्रलेख लिहत आज शिवसेने सत्तेत असलेल्या मित्र पक्ष व मोदीना सवाल केला आहे

कश्मीरातील हल्ल्यात 40 जवान शहीद झाले असतानाच पाकड्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणखी एका अधिकार्‍याचा बळी घेतला आहे.सैनिकास वीरगती प्राप्त व्हावी, पण ती प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढताना. इथे युद्धाची, अतिरेक्यांशी दोन हात करण्याची संधी न मिळताच जवानांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या आहेत. त्यांच्या मृतदेहांची ओळख पटण्यापलीकडे आहे. अलीकडे आमचा तिरंगा अभिमानाने फडकवण्यात कमी व मृत जवानांच्या शवपेट्यांना गुंडाळण्यातच जादा खर्च होत आहे. कोणतेही युद्ध नाही, पण एकाच वेळी 40 जवान गतप्राण होतात. हे गेल्या साडेचार वर्षांत पहिल्यांदा झालेले नाही. उणीदुणी काढण्याची ही वेळ नाही. सरकार व जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची, त्यांचे आत्मबल वाढविण्याची ही वेळ आहे, पण ‘सरकार’ विसरले असले तरी देशाची जनता काही गोष्टी विसरत नसते. काँग्रेस राजवटीत कश्मीरात अशा घटना घडल्या तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची वीरश्रीयुक्त भाषणे लोकांनी सोशल मीडियावर टाकून त्यांना त्यांच्याच भूमिकेचे स्मरण करून दिले आहे. ‘छप्पन्न इंचांची छाती’ हा शब्द कश्मीरसंदर्भातच आला. आमचे सैनिक कमजोर नसून दिल्लीत बसलेले सरकार लाचार आणि कमजोर असल्याचा घणाघात तेव्हा श्री. मोदी करीत होते. आणि आता मोदी गप्प का असा सवाल शिवसेने त्यांचा मुखपत्रातून केला आहे

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. आता भाजपाकडून असे सांगितले जाते आहे की काश्मीरमधील जवान शहीद झाले त्याचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपाला मतं द्या, कमळासमोरचे बटण दाबा, असा प्रचार सुरु करणं म्हणजे चाळीस जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखा प्रकार आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून या सगळ्या प्रकारावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. साडेचार वर्षात काश्मीरमध्ये गुलाबाचे ताटवे का कोमजले, आशेच्या गुलाबपाकळ्या का झडून पडल्या याचं उत्तर द्या असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.Body:.Conclusion:मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे संग्रहित फोटो वापरावे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.