ETV Bharat / state

कुलभूषण जाधवांना मायभूमीत आणणे हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल - शिवसेना

पाकिस्तानच्या ताब्यात असणारे कुलभुषण जाधव यांची सुटका करुन त्यांना सहिसलामत मायभूमीत आणणे हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल. मोदी व शहा यांनी मनात आणले तर काय अशक्य आहे? जाधव यांच्या सुटकेसाठी बळाचा वापर करा असे शिवसेनेने मुखपत्र सामनातून सरकारला सुचवले आहे.

कुलभुषण जाधव
author img

By

Published : Jul 19, 2019, 11:13 AM IST

मुंबई - पाकिस्तानच्या ताब्यात असणारे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची सुटका करुन त्यांना सहिसलामत मायभूमीत आणणे हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल. मोदी व शहा यांनी मनात आणले तर काय अशक्य आहे? जाधव यांच्या सुटकेसाठी बळाचा वापर करा, असे आवाहन शिवसेनेने मुखपत्र सामनातून सरकारला केले आहे.

अभिनंदनला मुक्त केले तसे कुलभूषण जाधव यांनाही करा

ज्याप्रमाणे आपल्या हवाई दलाचा वीर अभिनंदन पाकच्या हाती सापडला, पण आंतरराष्ट्रीय दबावांचा परिणाम व मोदी सरकारची भीती यामुळे अभिनंदनला पाकड्यांनी मुक्त केले. मग ते भाग्य कुलभूषण जाधव व त्यांच्या कुटुंबीयांना का मिळू नये? असा सवालही सेनेने केला आहे.

पाकिस्तानच्या तुरुंगात हिंदुस्थानी कैद्याने राहणे म्हणजे मृत्यूदंडच

हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस तूर्त स्थगिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानचे ‘बूच’ लावले असा प्रचार सुरू आहे. हिंदुस्थानचा हा विजय असल्याचे सांगितले जात आहे. ज्या दिवशी कुलभूषण जाधव हिंदुस्थानात परत येतील तो विजय दिवस मानता येईल. तसे काही झाल्याचे दिसत नाही. पाकिस्तानने ‘व्हिएन्ना’ समझोत्याचे उल्लंघन केले असल्याचे ताशेरे हेगच्या न्यायालयाने मारले, पण हिंदुस्थानच्याही सर्वच मागण्या मान्य केल्याचे दिसत नाही. मृत्युदंडाच्या शिक्षेस स्थगिती दिली हे ठीक, पण पाकिस्तानच्या तुरुंगात हिंदुस्थानी कैद्याने राहणे, म्हणजे मृत्यूंदंडच असल्याचे सेनेने म्हटले आहे.

अपहरण, लुटमार हा पाक लष्कराचा धंदाच

पाकचे लष्कर त्यांच्याच देशाच्या पंतप्रधानांना फासावर लटकवते. बेनझीर भुत्तो यांचाही खून केला गेला. खून, अपहरण, लुटमार हा पाक लष्कराचा धंदाच झाला आहे. जाधव यांना मुक्त करण्यासाठी पाक लष्कराने खंडणी मागितली तरी आश्चर्य वाटायला नको असे सेनेने म्हटले आहे.

लातों के भूत बातों से नहीं मानते

जाधव यांच्यासाठी हिंदुस्थान सरकार न्यायालयाची लढाई लढते आहे. हरीश साळवेंसारखे निष्णात वकील त्यासाठी दिले आहेत. पुन्हा या खटल्यासाठी त्यांनी फक्त एक रुपया नाममात्र मानधन घेतले. या न्यायालयीन लढाईत त्यांनी पाकिस्तानवर मात केली म्हणून तर ते अभिनंदनास पात्र आहेतच. पण त्यांच्या देशभावनेचेही कौतुक करायला हवे. तेव्हा आपले सरकार जाधव यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे हे मान्य केले तरी ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ हेच पाकिस्तानच्या बाबतीत सत्य आहे.

जाधव हे भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी देशसेवा केलीच आहे व हिंदुस्थानचा सुपुत्र म्हणूनच पाकने त्यांना पकडून एकप्रकारे जुलूमच चालवला आहे. अभिनंदनची सहिसलामत सुटका झाली हा आनंदच आहे. पण कुलभूषण जाधवांची सुटका करून त्यांना सहिसलामत मायभूमीत आणणे हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल. मनात आणले मोदी व शहा यांना काय अशक्य आहे असे सेनेने म्हटले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.