ETV Bharat / state

Shivaji Maharaj Statue : पाकिस्तान सीमेवर शिवाजी महाराजांचा पहारा; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जम्मू कश्मीर मधील कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमे नजीक आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याचं अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तसंच जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे सुद्धा उपस्थित होते.

Shivaji maharaj statue
शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 3:46 PM IST

मुंबई : जम्मू कश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांच्या सेनेमध्ये सर्व धर्म, जाती पंथाचे लोक एकत्र होते. जनता हीच त्यांच्यासाठी सर्वप्रिय होती. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' हे घोषवाक्य ऐकल्यावर सुद्धा अंगावर रोमांच उभे राहतात. आज सीमेवर आपला जवान दिवस रात्र एक करून सीमेचं रक्षण करत आहे. म्हणून जवानांना वीर, शूर जवान म्हटलं जातं. मुंबईतील राजभवन इथून निघालेला हा पुतळा जम्मू-काश्मीर पर्यंत पोहोचेपर्यंत सर्वांना ऊर्जा देत इथपर्यंत पोहोचला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

जवानांबरोबर दिवाळी : या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जम्मू कश्मीरमध्ये लष्करी अधिकारी व जवानांबरोबर दिवाळी साजरी करत फराळाचा आनंद लुटला. यासाठी हा मोठा योगायोग असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यासाठी फार मोठं भाग्य असावं लागतं असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवल्यानंतर या परिसरामध्ये फार मोठा विकास झाला असून आता शिवाजी महाराजांचा पुतळा येथे बसवल्यावर त्यांच्या आशीर्वाद व प्रेरणेनं येथील सर्व संकटं दूर होतील असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

शत्रू नजर उचलण्याची हिंमत करणार नाही : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये जी तलवार आहे, त्या दिशेला पाकिस्तान आहे. म्हणून आमचे शत्रू आमच्यावर नजर उचलण्याची जराही हिंमत करणार नाहीत. हा पुतळा बसवण्यापूर्वी इथे फार मोठा खड्डा होता. आपल्या जवानांनी १८०० गाड्या माती टाकून हा खड्डा बुजवला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिवाजी महाराजांचा सैनिकसुद्धा एका पायावर देशासाठी बलिदान द्यायला तयार होता. त्याचप्रमाणे देशासाठी सैनिकांचे वीरमरण कधीही विसरता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा भारतीय जवानांना ऊर्जा देईल, तर पाकिस्तानचा थरकाप उडवेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

भक्कम स्थितीत पुतळा : हा पुतळा साडेदहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ बाय ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात आला आहे. तर याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे. तसंच पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेनं आहे. इथे असलेला मोठा खड्डा बुजवण्यासाठी साधारण १८०० ट्रक मातीचा भराव टाकण्यात आला आहे. शिवाय या भागातील हवामान तसंच भूस्खलन याबाबी पाहता पक्कं बांधकाम करून मजबूत पाया तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. GramPanchayat Election : कराड उत्तरमध्ये शरद पवार गटाचा डंका, सातारा जावलीत भाजपाची तर पाटणमध्ये शिंदे गटाची घोडदौड
  2. Pune ISIS Module Case : साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा रचला होता कट ; पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात धक्कादायक माहिती
  3. Shivaji Maharaj Statue : भारत पाकिस्तान सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले . . .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.