ETV Bharat / state

Shivaji Maharaj International Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विक्रम; एका दिवसात 1032 विमानाने केलं उड्डाण - One Day 1 Lakh 61 Thousand Passengers

Shivaji Maharaj International Airport : शनिवारपासून दिवाळीनिमित्त सुट्ट्या (Diwali 2023 Holidays) लागल्या आहेत. दीपावली, भाऊबीज सणाच्या अनुषंगाने बसस्थानकातही प्रवाशांची गर्दी वाढली आहे. दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यानं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील एकाच दिवसात एक लाख 61 हजार 419 प्रवासी दाखल झाले आहेत.

Shivaji Maharaj International Airport
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 4:16 PM IST

मुंबई Shivaji Maharaj International Airport : दिवाळी (Diwali 2023) आणि आंतरराष्ट्रीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (Cricket World Cup 2023) या निमित्तानं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं प्रवाशांचा उच्चांक गाठलेला आहे. तब्बल एकाच दिवसात एक लाख 61 हजार 419 प्रवासी विमानतळावर दाखल झाले. तर 1032 विमानाने उड्डाण केलं आहे.

तीन दिवसात सव्वा पाच लाख प्रवासी : कोरोना नंतर सणासुदीच्या हंगामात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची प्रचंड संख्या वाढलेली आहे. 11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या दिवाळी सुट्टीच्या काळात, एकूण पाच लाख 16 हजार 562 प्रवाशांनी वाहतूक केली. तर निव्वळ 11 नोव्हेंबर 2023 रोजी 1032 विमानाने या ठिकाणी उड्डाण केलं.

कोरोना नंतर पहिल्यांदाच प्रचंड गर्दी : तब्बल दोन वर्षानंतर ही दिवाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अधिक उल्हासदायक ठरली. एकूण 11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर या दिवसात पाच लाख 16 हजार 562 प्रवाशांनी ये जा केली. त्यापैकी 3 लाख 54541 प्रवासी देशांतर्गत होते. तर 1 लाख 62 हजार 21 प्रवासी हे आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे होते.

11 नोव्हेंबर रोजी आधीचे रेकॉर्ड मोडले : 11 नोव्हेंबर 2023 रोजी मात्र प्रवाशांचा विक्रमी टप्पा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं गाठला आहे. या एका दिवसात 1032 विमानांनी येथून उड्डाण केलं. तर त्याच दिवशी एक लाख 61 हजार 419 प्रवासी या विमानतळावर उतरले, यामध्ये 53,680 आंतरराष्ट्रीय प्रवासी होते. तर एक लाख 7 हजार 765 प्रवासी देशातीलच होते.

जगातील अतिवर्दळ असणारे विमानतळ : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील काही मोजक्या विमानतळापैकी एक आहे. भारतामध्ये मुंबईनंतर दिल्ली, बंगळुरू, चेन्नई या ठिकाणी देखील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी प्रचंड संख्येने उतरतात.

तब्बल पाच वर्षानंतर आपलाच विक्रमी टप्पा ओलांडला : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण मुंबई यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, 9 डिसेंबर 2018 या दिवशी 1000 विमानांनी या विमानतळावरून उड्डाण करून विक्रम केला होता. त्यानंतर प्रथमच 5 वर्षानंतर 11 नोव्हेंबर रोजी 1032 विमानानी येथे उड्डाण केलं आहे. एक लाख 61 हजार 419 प्रवासी देखील या विमानतळावर उतरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पायाभूत सुविधा पुरविण्याकडे अधिक कटाक्ष असतो. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड हे आदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडद्वारे संचलित केलं जातं. आदानी एंटरप्राईज उपकंपनी ही जागतिक स्तरावर व्यवस्थापनाचा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारी कंपनी आहे. कंपनी सर्व त्या सुविधा आंतरराष्ट्रीय देशातील प्रवाशांना पुरवते.

हेही वाचा -

  1. Indigo Flight Bomb Threat : इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची पोकळ धमकी, प्रकरणाचा तपास सुरू
  2. मुंबईत फ्री फ्लाइट झोनमध्ये पॅराग्लायडर्स, बलून, उंच फटाके उडवण्यास बंदी
  3. दिल्ली विमानतळ जगात सातव्या, तर मध्य आशियात पहिल्या क्रमांकावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.