मुंबई - राज्यात मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात आज भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद आणि 16 मंत्रीपदांचा प्रस्ताव दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मात्र, यावर भाजपकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - शिवसेनेनं 5 वर्षात खूप सहन केलं, आणखी किती सहन करणार - बाळासाहेब थोरात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या (गुरूवारी) दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेचा विधीमंडळ पक्षनेता ठरवला जाणार आहे.
हेही वाचा - 'शिवसेनेसोबत बैठकीला बसल्यावर दहा मिनिटात मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवू'
सत्तेत 50 टक्के भाग मिळावा यासाठी शिवसेनेकडून सध्या शक्य तितके सर्व प्रयत्न केले जात आहेत. तर जे-जे शक्य होईल ते सर्व करणार, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले आहे. त्यामुळे या विधानावरून शिवसेना सत्तेत खाते वाटपाबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.