मुंबई : शिवसेना ठाकरे गटाची आज मुंबईत बैठक झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. आगामी मेळावे, शिवसेना वर्धापन दिनाबाबत चर्चा करण्यात आली आहे. बैठकीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी निर्णयांची माहिती दिली. मात्र, यावेळी निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला असताना नकारात्मक गोष्टी पसरवल्या जात आहेत. जनसामान्य, शिवसैनिकांमध्ये सकारात्मक बाबी आणि मुद्दे पोहोचवा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच जिल्हा प्रमुखांच्या शंकांचे निरसन आणि प्रश्नांची उत्तर सुद्धा या बैठकीत देण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत काहीच चर्चा झाली नाही -अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
बैठकीत काय निर्णय झाला : 18 जून रोजी मुंबईत शिवसेना पदाधिकार्यांचा भव्य मेळावा होणार आहे. तसेच 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्हाप्रमुखांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच प्रश्नांना उत्तरेही देण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
न्यायालयाच्या निकालाची माहिती : सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर शिवसेना शिंदे गट, भाजपमध्ये निकालावरून संभ्रम निर्माण होत असल्याचे ठाकरे गटाच्या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे बैठकीत जमलेल्या सर्व जिल्हाप्रमुखांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत संपर्क प्रमुखांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश शिवसेना कार्यकर्त्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळे या निकालापर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर टाकण्यात आल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुखांना जबाबदारी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वस्तुस्थिती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत, जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या निकालाची प्रत आणि त्यातील ठळक मुद्दे आता सर्व जिल्हाप्रमुखांनी समजून घ्यायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील सकारात्मक मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर असेल. शिवसेना ठाकरे गटाच्या या बैठकीकडे राज्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर प्रथमच सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबईत बोलावण्यात आले. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले.
- वाचा -
- Narendra Modi To Visit Japan : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेसाठी जपान, ऑस्ट्रेलियासह जाणार चार देशांच्या दौऱ्यावर
- Karnataka CM : दिल्लीत घडामोडींना वेग, सिद्धरामय्या-शिवकुमार खरगेंना भेटले
- PM Narendra Modi On Rozgar Mela : सरकारचे प्रत्येक धोरण रोजगार निर्मितीचे दार उघडणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी