ETV Bharat / state

Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या संघर्षातून शिंदे गटाची माघार; मुख्यमंत्र्यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर.... - दसरा मेळाव्याच्या संघर्षातून शिंदे गटाची माघार

Dasara Melava : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन याही वर्षी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये संघर्ष पेटला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांकडून महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आला होता. तर यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde On Dasara Melava) यांनी घेतल्याची माहिती आमदार सरवणकर यांनी दिली.

Dasara Melava
दसरा मेळावा आझाद मैदानावर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 4:24 PM IST

मुंबई Dasara Melava : शिवसेना आणि दसरा मेळावा हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं समीकरण झालं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जहाल हिंदुत्ववादी विचार ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक शिवतीर्थावर जमा होत असतात. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Shinde Dasara Melava) म्हणजे शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरत होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचा वारसा चालू ठेवत शिवतीर्थावर मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि जनतेला संबोधित करण्याची परंपरा चालू ठेवली आहे. मात्र एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दसरा मेळाव्याचा प्रश्न निर्माण झाला. दसरा मेळावा घेण्याची परवानगी उद्धव ठाकरे गटाला दिली होती. तर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या मैदानावर दसरा मेळावा (CM Eknath Shinde On Dasara Melava) घेतला होता, जो नंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

दसरा मेळाव्यासाठी परवानगी अर्ज : यंदा दोन्ही शिवसेना गटांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर मेळावा घेण्याची परवानगी मिळावी, यासाठी अर्ज दाखल केले होते. या परवानगी अर्जांचा विचार करून योग्य निर्णय दिला जाईल, असं मुंबई महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं. आपणच पहिल्यांदा अर्ज दाखल केल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात होता. एक सप्टेंबरला आपण दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला. तर सात सप्टेंबरला अर्ज दाखल केल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटानं दिली होती. मात्र सात सप्टेंबरला आपण आणखी एक अर्ज दाखल केल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर : शिवतीर्थावर शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्ववादी विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक आणि जनता ज्या पद्धतीनं जमा होत होती, त्याच पद्धतीचा हिंदुत्ववादी विचार शिवसेना शिंदे गटाकडून निश्चितच दिला गेला असता. मात्र या सर्व बाबी टाळून दसरा मेळाव्याच्या मैदानावरून कोणताही वादविवाद नको म्हणून आपण शिवाजी पार्कवरील आपला दावा सोडत आहोत. यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर (Azad Maidan) घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतल्याची माहिती आमदार सरवणकर यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची भूमिका ही नेहमीच समजूतदारपणाची राहिली आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Shivaji Park Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने; महापालिकेची भूमिका काय?
  2. PIL Against CM Shinde Dussehra Melawa: शिंदेंच्या 'त्या' कार्यक्रमातील 10 कोटी खर्चाच्या निधीचा स्रोत काय? याचिका दाखल
  3. Sanjay Raut on Dasara Melava : शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? दसरा मेळाव्यावरुन राऊतांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.