ETV Bharat / state

Abdul Sattar : अंधेरी पोट निवडणुकीत उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटाचा विचार - अब्दूल सत्तार

अंधेरी येथील पोट निवडणुकीत ( Andheri east by poll election )आता भाजपच्या उमेदवारा ऐवजी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार दिला जाईल का याबाबत चाचणी सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी ( Agriculture Minister Abdul Sattar ) दिली आहे.

Abdul Sattar
अब्दूल सत्तार
author img

By

Published : Oct 13, 2022, 4:38 PM IST

Updated : Oct 13, 2022, 5:39 PM IST

मुंबई : अंधेरी येथील पोट निवडणुकीत ( Andheri east by poll election )आता भाजपच्या उमेदवारा ऐवजी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार दिला जाईल का याबाबत चाचणी सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी ( Agriculture Minister Abdul Sattar ) दिली आहे. मात्र याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील अन्यथा भाजपने उमेदवार दिल्यास आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देऊ असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

माहिती देताना मंत्री अब्दुल सत्तार

उमेदवारी देण्याबाबत चर्चा : अंधेरी येथील पोटनिवडणुकीत भाजपच्यावतीने मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू ( BJP candidate Murji Patel name ) आहे. मुर्जी पटेल यांचा उमेदवारी अर्ज अद्याप भरला गेलेला नाही तर दुसरीकडे यांच्या उमेदवारीबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता नेमके कोण उमेदवार रिंगणात उतरणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा विचार - दरम्यान अंधेरी पूर्व मतदार संघातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे उमेदवार रिंगणात उतरवायचा की नाही यासंदर्भात सध्या चाचणी सुरू आहे यासंदर्भातील निर्णय मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील अशी माहिती कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी दिली आहे.
वास्तविक या ठिकाणी भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार अशी चर्चा असताना आता शिंदे गटाच्या उमेदवारा बाबतही तयारी सुरू करण्यात आली आहे.

भाजपाच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा - दरम्यान अंधेरी पूर्व मतदार संघात भाजपने आपला उमेदवार दिल्यास आम्ही युती म्हणून सोबत आहोत त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देणार आहोत त्याच्या विजयासाठी प्रयत्न करणार असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

विजयाचे दावे सर्वच करतात - शिवसेना ठाकरे गटाकडून पारंपारिक मतदार संघ असल्याने या मतदारसंघात सातत्याने विजयाचा दावा केला जात आहे या संदर्भात विचारले असता सत्तार म्हणाली की विजयाचे दावे सर्वच उमेदवार करतात मात्र मतदारांच्या मनात कोण आहे मतदारांचा कौल कुणाला आहे तोच जिंकतो आणि आम्ही या निवडणुकीत नक्कीच जिंकू असा विश्वासही सत्कार यांनी व्यक्त केला.

Last Updated : Oct 13, 2022, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.