ETV Bharat / state

Anil Parab : अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण; अनिल परब यांना 6 जुलैपर्यंत दिलासा

मुंबई महानगरपालिकेतील अभियंता यांना मारहाण केल्या प्रकरणात शिवसेनेचे काही कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच या संपूर्ण प्रकाराला चिथावणी दिली म्हणून अनिल परब यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार होती. मात्र आज न्यायालयाने उशिरा अनिल परब यांना अटकपूर्व जामीन पूर्णतः मंजूर केला आहे. तसेच इतरांचा देखील जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सर्वांचा जामीन मंजूर केला

Former Minister Anil Parab
माजी मंत्री अनिल परब
author img

By

Published : Jul 4, 2023, 10:05 PM IST

Updated : Jul 4, 2023, 10:31 PM IST

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावर हातोडा उचलण्यात आल्याने, संतप्त शिवसैनिकांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. अनिल परब यांच्यावर देखील मारहाण केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात अटकपूर्वक जामीन मिळण्यासाठी माजी मंत्री अनिल परब यांनी सत्र न्यायालय धाव घेतली होती. त्या बाबत न्यायालयात आज झालेल्या सुनावणीमध्ये अनिल परबसह इतर आरोपीना सत्र न्यायालयाच्या राहुल रोकडे यांनी 6 जुलै पर्यंत दिलासा दिला आहे.

जामीन अर्जावर 6 जुलै पर्यंत दिलासा : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ह्या प्रकरणात आरोपी असलेले माजी मंत्री आमदार अनिल परब यांच्यासह इतर आरोपी स्नेहा साटम, दीपक गुटकर, दिनेश कुबल, संदीप शिवलकर, चंद्रशेखर वाईंगणकर, एवढे अटकपूर्व जामीन तर, याच प्रकरणात अर्थर रोड तुरुंगात असलेले आरोपी सदानंद कदम, संतोष कदम, उदय दळवी, हाजी आलिम खान यांच्या जामीन अर्जावर 6 जुलै पर्यंत दिलासा दिला आहे.

यांना जामीन मंजूर : या प्रकरणांमध्ये सदानंद परब, संतोष कदम, उदय दळवी, माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांना जामीन मंजूर केला गेला. प्रत्येकाला वैयक्तिक 15000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जमीन मंजूर झाला. या आरोपींना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली होती. मात्र आता त्यांचा अखेर जामीन मंजूर झाला. तसेच अनिल परब माजी मंत्री आणि आमदार यांना देखील असाच जामीन अखेर मंजूर करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणांमध्ये अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे प्रकरण ? : मुंबईतील ठाकरे गटाची शिवसेना शाखा कार्यालय महानगरपालिकेने जमीनदोस्त केल्याबाबत तेथे कारवाई करत असताना, पालिका अधिकाऱ्याला काही कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत चार कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र ठाकरे गटाकडून तात्काळ जामीनासाठीचा अर्ज सत्र न्यायालयात नुकताच दाखल करण्यात आला. परंतु न्यायालयाने आज अखेर तूर्त दिलासा दिला.

ही आहे पार्श्वभूमी : मुंबई येथील वांद्रे पूर्व या परिसरामध्ये उद्धव ठाकरे गटाची किंवा पूर्वीच्या शिवसेनेची 40 वर्षापासूनची जुन्या शिवसेना शाखेचे कार्यालय आहे. हे कार्यालय बेकादेशीर असल्याचे महानगरपालिकेचे म्हणणे होते. त्यांनी त्यामुळे त्या कार्यालयावर कारवाई केली. तसेच ते जमीनदोस्त केले. ती कारवाई करत असताना काही कार्यकर्ते यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत, पालिका अधिकाऱ्यांनी तसा गुन्हा देखील दाखल केला होता. त्यानुसार या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना आता मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची 11 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे.

हेही वाचा -

  1. Anil Parab : महापालिकेचे अभियंता संजय पाटील यांना मारहाण प्रकरणी अनिल परबांना दिलासा
  2. Anil Parab News : मनपा अभियंत्यांना मारहाण; अनिल परब यांच्यासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Last Updated : Jul 4, 2023, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.