ETV Bharat / state

Shiv Sena Petition Live updates : एका आठवड्यात विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घ्यावी-सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - राहुल नार्वेकर

Shiv Sena Petition Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेसंबंधी दोन याचिकांवर सुनावणी सुरू आहे. राज्याच्या पुढील राजकारणाची दिशा यावर अवलंबून असणार आहे. कोणत्या आहेत या याचिका, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

Supreme Court
सर्वोच्च न्यायालय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 9:49 AM IST

Updated : Sep 18, 2023, 4:08 PM IST

नवी दिल्ली Shiv Sena Petition Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखायला हवा होता, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. सुनावणी लांबवण्याचा कोणताही उद्देश नव्हता, असं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी स्पष्ट केलयं. २ आठवड्यानंतर तुम्ही काय कारवाई केली ते सांगा, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यानंतर ठाकरे गटाकडून आमदार अपात्रतेसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी सुरू आहे.

Live Updates-

  • ठराविके वेळेत निर्णय घ्या, असे विधानसभा अध्यक्षांना निर्देश होते. ४ महिने होऊनही निर्णय घेतल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. ते उशीर करू शकत नाहीत. दीड वर्षानंतर शिंदे गटाकडून उत्तर दाखल करण्यात आले आहे.
  • कोर्टाच्या आदेशाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा आहे. एका आठवड्यात विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
  • हे सरकार बेकायदेशीर सुरू असून तातडीनं सुनावणी घ्यावी, असा युक्तीवाद ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलाय.

महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीनं सोमवारचा दिवस (१८ सप्टेंबर) अत्यंत महत्वाचा आहे. राज्यातील दोन महत्वाच्या प्रकरणांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही प्रकरणाचा संबंध शिवसेनेशी आहे. या याचिकांवर एकापाठोपाठ सुनावणी सुरू झाली. त्यामुळे आज सर्वांचं लक्ष दिल्लीतील सुप्रीम कोर्टाकडे असणार आहे.

कोणत्या याचिकांवर सुनावणी होणार : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. तसेच आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होईल.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी : निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय देत, शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. सर्वोच्च न्यायालयातही याचा निकाल लागला आहे. ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज सुनावणी आहे.

राहुल नार्वेकर यांच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी : दुसरीकडे, शिवसेनेच्या शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रेतबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीनं निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटानं दाखल केली आहे. आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केलीय. या याचिकेवर देखील आज सुनावणी होईल. यापूर्वी झालेल्या सुनावणीत, सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा :

  1. Parliament Special Session २०२३ : संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात, जाणून घ्या पहिल्या दिवसाचा प्लॅन
  2. Maharashtra Political Crisis Hearing : शिवसेना, सरकारचं काय होणार? शिंदे, ठाकरे गटाचं लक्ष 'सर्वोच्च न्यायालयाकडं'
  3. Shivsena Political Crisis : 'शिवसेना कोणाची' सुनावणीला सुरुवात, ठाकरे गटाच्या आमदारांना बोलावणं नियमबाह्य - भास्कर जाधव यांचा दावा

Last Updated : Sep 18, 2023, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.