मुंबई - परराज्यातील कामगारांना पाठण्यासाठी 80 गाड्या मागितल्यानंतर 40 गाड्या उपलब्ध करण्यात आल्या, हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी फेसबुकवर केलेल्या संवादात सांगितले होते. हे वक्तव्य रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळेचे त्यांनी रविवारी रात्री ट्विट करत 125 गाड्या देण्याची तयारी दर्शवली, असे म्हणत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली.
महाराष्ट्र सरकारने यादी द्यावी, आम्ही 125 गाड्या देतो, असे गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले. महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या रेल्वे मंत्रालयाकडे 197 गाड्यांची मागणी केली होती. आजही 40 गाड्या सोडण्यात येणार आहे. अजून 157 गाड्यांचे आजही मागणी आहे. आत्तापर्यंत रेल्वेने कधीच प्रवाशांची यादी मागितली नव्हती मात्र, पियुष गोयल प्रवाशांची यादी मागत आहेत. अन्य राज्यांकडेही गोयल यांनी प्रवाशांच्या यादीची मागणी केली का? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.
आतापर्यंत महाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेने लाखो परप्रांतीय मजुरांना पाठवले आहे. त्यांची यादी त्यावेळेस का मागितली नाही. अधिकृत वास्तव भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली ते गोयल यांना झोमलं असल्याचे सावंत म्हणाले. त्यानंतर ताबडतोब ट्वीट करून एका तासात प्रवाशांची यादी द्या, गाड्यांच्या नियोजनाला आम्हाला वेळ लागतो असे गोयल यांनी म्हटले आहे. मग आम्हालाही यादीत यायला थोडा वेळ लागतो असे सावंत यांनी गोयल यांना प्रत्युत्तर दिले.