ETV Bharat / state

मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी करणाऱ्या तृप्ती सावंत म्हणाल्या, आता जे होईल ते मैदानात पाहू !

शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांच्याऐवजी महापौर महाडेश्वरांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे नाराज सावंत आणि त्यांच्या समर्थकांनी मातोश्री'वर जाऊन नाराजी व्यक्त केली. मात्र, शेवटपर्यंत त्यांना फक्त आश्वासन देवून टाळाटाळ करत असल्याने त्यांनी ४ तारखेला वांद्रे पूर्व मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरून टाकला. तर, आता मैदानात उतरले असल्याने जे काय करायचं असेल ते मी मैदानात करून दाखवणार असल्याचे सावंत म्हणाल्या.

आमदार तृप्ती सावंत
author img

By

Published : Oct 9, 2019, 1:43 PM IST

मुंबई - माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी मैदानात उभी राहिली आहे. अर्ज मागे घ्यावा म्हणून मला अनेक प्रकारची आश्वासने देण्यात आली, दबावही वाढवण्यात आला. परंतु, आता मी मागे हटणार नाही मैदानात उतरले असल्याने 'जे काय करायचं असेल ते मी मैदानात करून दाखवणार'. अशी दृढ प्रतिक्रिया वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या विद्यमान आमदार व बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत 'ईटीव्ही भारत'शी यांनी बोलताना दिली.

'ईटीव्ही भारत'शी चर्चा करताना वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत

मातोश्रीच्या अंगणात असलेल्या वांद्रे पूर्वे मतदारसंघातून तृप्ती सावंत यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली आहे. शिवसेनेला या मतदारसंघात त्यांनी तगडे आव्हान दिले आहे. सेनेने त्यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या ठिकाणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मैदानात उतरविले. त्यामुळे, या मतदारसंघात तृप्ती सावंत विरुद्ध महापौर महाडेश्वर या २ शिवसैनिकांमध्ये खरी रंगत दिसणार आहे.

हेही वाचा - जगनमोहनच्या गीताची शिवसेनेने केली हुबेहुब 'नक्कल'?
यावेळी बोलताना सावंत म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आम्ही शिवसेनेकडे विचारणा सुरू केली. शिवसेनेकडून सर्वांना एबी फॉर्म दिले जात होते, तेव्हा आम्हाला कधी मिळतील? या प्रश्नावर शिवसेनेकडून वेळकाढूपणा करण्यात आला. अनेकदा वेळ लागेल थोडे थांबा असे आश्वासन देण्यात आल्याने आम्ही थांबलो. मात्र, शेवटपर्यंत तिकडून काहीच होत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही 30 सप्टेंबर रोजी 'मातोश्री'वर गेलो. त्यासाठी विभागप्रमुख यांच्यासह सगळ्यांना यासाठीची माहिती देण्यात आली होती.

हेही वाचा - शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका; मात्र उध्दव ठाकरेंकडून 'आरे'चा उल्लेखही नाही
त्यानंतर मला बंगल्यावरून फोन करण्यात आला की, साहेब आपल्याला ४ तारखेला १० वाजता फोन करतील. ते मान्य करून ४ तारखेला सकाळी १० पासून मी फोनची वाट पाहत राहीले. मात्र फोन न आल्याने १ वाजता वांद्रे पूर्व मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरून टाकला अशी माहिती सावंत यांनी दिली. त्यानंतर अर्ज मागे घेतला नाही म्हणून मला अनेकांचे फोन आले. उमेदवारी अर्ज मागे घ्या म्हणून अनेक आश्वासने देण्यात आली. मात्र, या मतदारसंघातून निवडून येणे हेच माझे मुख्य उद्देश ठरले आहे, त्यामुळे आता माघार घेणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा - दसरा मेळावा! शिवसेनेसाठी आता सत्ता हिच 'शीव' झाली आहे का?
आपल्या मतदारसंघात आपण खूप मोठ्या प्रमाणात काम केलेले आहेत. ८ वर्षांपूर्वी माझे पती, माजी आमदार बाळा उर्फ प्रकाश सावंत यांच्याकडून काही अर्धवट राहिलेली कामे आता पूर्ण झालेली आहेत. स्थानिक पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. येथील शासकीय वसाहतींचे प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे मला मतदार कौल देतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. तसेच त्यांच्या मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी इमारतीच्या प्रकल्पांचे मोठे प्रश्न आहेत. अनेकांना अद्यापही घर मिळाले नाही, अनेकांना भाडे दिले जात नाही. म्हणून, आपण त्या लोकांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. यात रफिक नगर, भारत नगर अशा ठिकाणी तेथील स्थानिकांना मदत करण्यासाठी मी स्वतः पुढे असते. काही भागांमध्ये बिल्डर लोकांनी खूप किचकट कामकाज करून ठेवले आहे. तरीही आपण स्थानिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी मैदानात उतरलेच आहे तर, त्यासाठी आता जे काय करायचं आहे ते मैदानातच करून दाखवणार असल्याचे सावंत म्हणाल्या.

हेही वाचा - 'मनसे' करणार का 'राज'कीय सीमोल्लंघन?

Intro:मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी करणाऱ्या तृप्ती सावंत म्हणाल्या, आता जे होईल ते मैदानात पाहू !

mh-mum-01-sena-mla-truptisavant-121-7201153

(मोजोवर फीड पाठवले आहे)

मुंबई, ता. ८

माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी मैदानात उभी राहिली आहे. मला अनेक प्रकारचे आश्वासने देण्यात आली अर्ज मागे घ्यावा म्हणून दबावही वाढवण्यात आला. परंतु आता मी मागे हटणार नाही. आता मैदानात उतरले असल्याने जे काय करायचं असेल ते मी मैदानात करून दाखवणार असल्याचा दृढ वांद्रे पूर्व येथील शिवसेनेच्या विद्यमान आमदार व बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत ' ई टी व्ही भारत ' शी यांनी बोलताना दिली.

मातोश्रीच्या अंगणात असलेल्या वांद्रे पूर्वे विधानसभा मतदारसंघातून तृप्ती सावंत यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली आहे. शिवसेनेला या मतदारसंघात त्यांनी तगडे आव्हान दिले आहे. सेनेने त्यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या ठिकाणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे या मतदारसंघात तृप्ती सावंत विरुद्ध महापौर महाडेश्वर अशी दोन शिवसैनिकांमध्ये खरी रंगत दिसणार आहे.

सावंत म्हणाल्या की,निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आम्ही शिवसेनेकडे विचारणा सुरू केली. शिवसेनेकडून सर्वांना एबी फॉर्म दिले जात आहेत, तेव्हा आम्हाला कधी मिळतील? त्यावर शिवसेनेकडून वेळकाढूपणा करण्यात आला. अनेकदा वेळ लागेल थोडे थांबा. असं आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आम्ही थांबलो. आणि शेवटपर्यंत तिकडून काहीच होत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही 30 सप्टेंबर रोजी मातोश्रीवर गेलो. त्यासाठी विभागप्रमुख यांच्यासह सगळ्यांना यासाठीची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मला बंगल्यावरून फोन करण्यात आला की, साहेब आपल्याला चार तारखेला दहा वाजता फोन करतील. मग मी ते मान्य करून वाट पाहत राहीले. त्यानंतर फोनची वाट पाहत होते. सकाळचे दहा वाजले. अकरा वाजले. त्यानंतर अखेर आम्ही बारा वाजता वाट बघून शेवटी एक वाजता आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरून टाकला.अशी माहिती सावंत यांनी दिली.अर्ज मागे घेतला नाही म्हणून मला अनेकांचे फोन आले. त्याचा मानसिक त्रास झाला. त्यानंतर मला उमेदवारी अर्ज मागे घ्या म्हणून अनेक आश्वासने देण्यात आली. परंतु मी मागे हटले नाही. मला या मतदारसंघातून निवडून येणे हेच माझे मुख्य उद्देश ठरले आहे, त्यामुळे आता माघार घेणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
माझ्या मतदारसंघात मी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेले आहेत. आठ वर्षांपूर्वी माझे पती व माजी आमदार बाळा उर्फ प्रकाश सावंत यांच्याकडून काही पेंडिंग राहिलेली कामे आता पूर्ण झालेले आहेत. स्थानिक पायाभूत सुविधांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत. येथील शासकीय वसाहतीचा प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे मला मतदार कौल देतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.माझ्या मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी इमारतीच्या प्रकल्पांचे मोठे प्रश्न आहेत.अनेकांना अद्यापही घर मिळाले नाही. अनेकांना भाडे दिले जात नाही. म्हणून मी त्या लोकांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला आहे. यात रफिक नगर, भारत नगर असेल अशा ठिकाणी येथील स्थानिकांना मदत करण्यासाठी मी स्वतः पुढे असते. काही भागांमध्ये बिल्डर लोकांनी खूप किचकट कामकाज करून ठेवले आहे. तरीही मी स्थानिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी मैदानात उतरलेच आहे, त्यासाठी आता जे काय करायचं आहे ते मैदानात करून दाखवणार असल्याचे त्या म्हणाल्या.Body:मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी करणाऱ्या तृप्ती सावंत म्हणाल्या, आता जे होईल ते मैदानात पाहू ! Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.