ETV Bharat / state

ठाकरे गटाकडून बनावट कागदपत्रं सादर, शुक्रवारपासून शिंदे गटाची उलट तपासणी - MLA Disqualification Hearing

MLA Disqualification Hearing : आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी झाली. यावेळी शिंदे गटाच्या वकीलांनी प्रभूंना कोंडीत पकडलं होतं. तर, 1 डिसेंबरपासून शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांची उलटतपासणी सुरू होणार आहे.

MLA Disqualification Hearing
MLA Disqualification Hearing
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 9:16 PM IST

मुंबई MLA Disqualification Hearing : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी करण्याचा शेवटचा दिवस होता. आज झालेल्या सुनावणीत सुद्धा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना हैराण केलं. इतकेच नाही, तर अध्यक्षांसमोर ठाकरे गटाकडून बनावट कागदपत्रं सूपर्द करण्यात आल्याप्रकरणी शिंदे गटाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिंदे यांना मेल की पत्र : आमदार अपात्रतेची मागील अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून उलट तपासणी सुरू होती. आज प्रभू यांच्या उलट तपासणीचा शेवटचा दिवस होता. आज झालेल्या सुनावणीत जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना शिंदे यांना ईमेल तसंच पत्राच्या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद केला. 22 जून 2022 ते 23 जून 2022 अशा दोन तारखांचा घोळ असल्यानं त्यावर जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसंच ज्या ईमेलवर एकनाथ शिंदे यांना मेल पाठवण्यात आला, तो त्यांनी कधीही वापरला नाही, असं जेठमलांनी यांनी म्हटलंय. त्यावर प्रभू यांनी जेठमलांनींचा आरोप फेटाळून लावत, सर्व रेकॉर्डनुसार केल्याचं सांगितलं.

निवडणुक आयोगाला बनावट पत्र : ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी 4 एप्रिल 2018 ला तत्कालीन शिवसेना पक्षाच्या घटना संदर्भात निवडणुक आयोगाला दिलेलं पत्र बनावट असल्याचा दावा शिंदे गटानं केला आहे. हे पत्र पक्षांतर्गत घटनेत संघटनात्मक बदल केल्याचं दावा करण्यात आला होता. तसंच हे पत्र निवडणुक आयोगाला दिल्याचा दावा ठाकरे गटानं केला आहे. त्याचप्रमाणे हे पत्र पूर्णतः बनावट पत्र असून आजपर्यंतच्या कोणत्याच सुनावणीत सादर करण्यात आलं नसल्याचा दावाही शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा ईमेल आयडी फेक असून आम्ही या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही शिंदे गटानं सांगितलं. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांना अर्ज देऊन चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.

हे सर्व खोटे आहे : यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले की, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा पक्ष सुद्धा नाही आहे, असंही ते म्हणू शकतात. त्यांच्या दृष्टीनं ते प्रश्न विचारात आहेत. त्यात काहीच तथ्य नाही आहे. प्रत्येक पक्ष निवडणुक आयोगानं घालून दिलेल्या नियमांनुसार काम करतात. त्याच प्रमाणं प्रत्येक पक्षाला काही तत्त्व पळावी लागतात. सगळे कागद पत्र आम्ही दिलेले आहे. ते जे म्हणत आहेत, ते सर्व खोटं आहे. त्यादरम्यान पक्षांतर्गत कारवाया कशा झाल्या, हे सर्व माध्यमांनी दाखवलं आहे. निवडणूक आयोगाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत.

संपर्काची साधनं जप्त करण्याची मागणी : विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयातील अनिल देसाई, सुनील प्रभू, विजय जोशी यांनी वापरलेली कॉम्पुटर, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल इतर संपर्काची साधनं जप्त करण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. कोकणासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  2. नारायण राणेंनी पुन्हा एकदा मराठा समाजाला डिवचलं; मनोज जरांगे पाटलांचा एकेरी उल्लेख
  3. 'गो बॅक' म्हणत छगन भुजबळांच्या दौऱ्यानंतर आंदोलकांनी शिंपडलं गोमूत्र; कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर अखेर भुजबळांनी अर्धवट सोडला दौरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.