मुंबई - अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार तुकाराम काते यांच्या प्रचारार्थ वाशीनाका येथे शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ऑक्टोबर हिट असल्यामुळे सर्वजण घामाने भिजले होते. म्हणून रोड शो न करताच आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना एकाच ठिकाणी खुल्या वाहनावर उभे राहून संबोधित केले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी अनुशक्ती नगरमधील उमेदवार तुकाराम काते यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले. कडक ऊन असल्यामुळे शिवसैनिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - विधानसभा २०१९ : भाजपच्या 'संकल्प'नाम्यात सावरकर , आंबेडकर.. तर शिवसेनेची १० रुपयात सकस थाळी