ETV Bharat / state

येथे चार वर्षांपासून मिळतेय १० रुपयांत थाळी, शिवसेनेने अर्ध्या तासाच्या अंतराने केले दोनदा उद्घाटन - मुंबई शिवसेना बातमी

१० रुपयांच्या थाळीचे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी स्वागत केले आहे. गरिबांना स्वस्त दरात अन्न मिळत असल्याने आपण त्याचे स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे. अशी थाळी पालिका कॅन्टीनमध्ये गेल्या चार वर्षांपासून मिळत आहे. याची माहिती पालिकेतील सत्ताधाऱ्यांना नसावी म्हणून त्यांनी आज त्याचे उद्घाटन केले, असे म्हणत भाजपने त्यांची खिल्ली उडवली आहे.

shiv-sena-inaugurated-10-rupees-thali-in-municipality-in-mumbai
चार वर्षांपासून पालिकेत मिळणाऱ्या 'थाळी'चे शिवसेनेने केले दोन वेळा उद्घाटन
author img

By

Published : Dec 19, 2019, 10:31 PM IST

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली 10 रुपयात जेवणाची थाळी आज महापालिका कॅन्टीनमध्ये सुरू करण्यात आल्याचे सत्ताधाऱ्यांनी जाहीर केले. मात्र, अशी थाळी गेल्या चार वर्षापासून पालिकेच्या कॅन्टीनमध्ये मिळत असल्याने ती थाळी खाणाऱ्यांमध्ये आज स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचा समावेश झाला. त्यांचे अभिनंदन, असे म्हणत भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. तर ही थाळी आधी मिळत होती. मात्र, आज पासून त्याचे प्रदर्शन केले जाईल, असा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. दरम्यान, आज शिवसेनेकडून दोन वेळा या थाळीचे उद्घाटन केल्याने पालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत नसल्याची चर्चा पालिकेत आहे.

चार वर्षांपासून पालिकेत मिळणाऱ्या 'थाळी'चे शिवसेनेने अर्ध्या तासाच्या अंतराने केले दोन वेळा उद्घाटन

हेही वाचा- IPL Auction २०२० : लिलावाला सुरूवात, मुंबईच्या संघात हा धडाकेबाज फलंदाज

दोन वेळा झाले उदघाटन -
मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये गेले चार वर्ष १० रुपयात जेवणाची थाळी मिळत होती. त्यात दोन चपात्या, दोन भाज्या, डाळ, भात दिला जातो. मात्र, आज पुन्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून १० रुपयात जेवणाच्या थाळीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आदी नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर अर्ध्या तासानंतर आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना आणून पुन्हा या थाळीचे उद्घाटन केले. यामुळे पालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या थाळीच्या उदघाटनावरून एकमत नसल्याची चर्चा पालिका मुख्यालयात सुरू झाली.

हेही वाचा- श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर धार्मिक विधी न करता शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार

भाजपने उडवली खिल्ली -
१० रुपयांच्या थाळीचे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी स्वागत केले आहे. गरिबांना स्वस्त दरात अन्न मिळत असल्याने आपण त्याचे स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे. अशी थाळी पालिका कॅन्टीनमध्ये गेल्या चार वर्षांपासून मिळत आहे. याची माहिती पालिकेतील सत्ताधाऱ्यांना नसावी म्हणून त्यांनी आज त्याचे उद्घाटन केले. शिवसेनेचा १० रुपये थाळीचा अजेंडा आहे. त्यांनी आज पासून १० रुपयाची थाळी देण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे अभिनंदन, अशी शिवसेनेची खिल्ली कोटक यांनी उडवली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून १० रुपये थाळीची संकल्पना पालिका कॅन्टीनमध्ये सुरू केली. कॅन्टीनमध्ये अशी थाळी याआधीही मिळत होती. आजपासून या थाळीचे प्रदर्शन केले गेले. आता रोज ही थाळी पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध असेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

आयुक्त गैरहजर -
पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना १० रुपयात जेवणाची थाळी उपलब्ध करून देण्यासाठी आज स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेत्या तसेच नंतर महापौर कॅन्टीनगमध्ये आल्या. मात्र, दोन्ही वेळी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी हे दोन्ही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत.

Intro:मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली 10 रुपयात जेवणाची थाळी आज महापालिका कॅन्टीनमध्ये सुरू करण्यात आल्याचे सत्ताधाऱ्यांनी जाहीर केले. मात्र अशी थाळी गेल्या चार वर्षपासून पालिकेच्या कँटीनमध्ये मिळत असल्याने ती थाळी खाणाऱ्यांमध्ये आज स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचा समावेश झाला त्यांचे अभिनंदन असे म्हणत खिल्ली भाजपाकडून उडवण्यात आली आहे. तर ही थाळी आधी मिळत होती मात्र आज पासून त्याचे प्रदर्शन केले जाईल असा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. दरम्यान आज शिवसेनेकडून दोन वेळा या थाळीचे उदघाटन केल्याने पालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत नसल्याची चर्चा पालिकेत आहे. Body:दोन वेळा झाले उदघाटन -
मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅंटीनमध्ये गेले चार वर्ष १० रुपयात जेवणाची थाळी मिळत होती. त्यात दोन चपात्या, दोन भाज्या, डाळ, भात दिले जाते. पालिकेत गेले चार वर्ष जेवणाची थाळी १० रुपयात मिळत असताना आज पुन्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून १० रुपयात जेवणाच्या थाळीचा शुभारंभ स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आदी नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर अर्ध्या तासानंतर आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना आणून पुन्हा या थाळीचे उदघाटन केले. यामुळे पालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु केलेल्या थाळीच्या उदघाटनावरून एकमत नसल्याची चर्चा पालिका मुख्यालयात आहे.

भाजपाने उडवली खिल्ली -
१० रुपयांच्या थाळीचे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी स्वागत केले आहे. गरिबांना स्वस्त दारात अन्न मिळत असल्याने आपण त्याचे स्वागत करतो असे त्यांनी म्हटले आहे. अशी थाळी पालिका कॅंटीनमध्ये गेल्या चार वर्षांपासून मिळत आहे. याची माहिती पालिकेतील सत्ताधाऱ्यांना नसावी म्हणून त्यांनी आज त्याचे उदघाटन केले. शिवसेनेचा १० रुपये थाळीचा अजंडा आहे. त्यांनी आज पासून १० रुपयाची थाळी खाण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे अभिनंदन अशी शिवसेनेची खिल्ली कोटक यांनी उडवली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून १० रुपये थाळीची संकल्पना पालिका कॅंटीनमध्ये सुरु केली. कॅंटीनमध्ये अशी थाळी या आधीही मिळत होती. आजपासून या थाळीचे प्रदर्शन केले गेले. आता रोज ही थाळी पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ती रोज उपलब्ध असेल असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

आयुक्त गैरहजर -
पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना १० रुपयात जेवणाची थाळी उपलब्ध करून देण्यासाठी आज स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेत्या तसेच नंतर महापौर कँटिंगमध्ये आल्या. मात्र दोन्ही वेळी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी हे दोन्ही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत.

बातमीसाठी vis, भाजपा गटनेते मनोज कोटक आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचा बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.